‘त्या’ आक्षेपार्ह ट्विटवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं स्पष्टीकरण

या ट्विटवर एका व्यक्तीने कंत्राट कोणाला दिले? असा प्रश्न विचारला होता. यावर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना ‘तुझ्या बापाला’ असं म्हटलं होतं. हे ट्विट व्हायरल होऊ लागल्यानंतर महापौरांवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्यानंतर महापौरांनी अखेर हे ट्विट डिलीट केलं.

    मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सध्या आपल्या एका ट्विटमुळे चर्चेत असून वादात अडकल्या आहेत. लसींच्या ग्लोबल टेंडरसंबंधी प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्याचा बाप काढल्याने किशोरी पेडणेकर सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. वाद निर्माण होताच किशोरी पेडणेकर यांनी हे ट्विट डिलीट केलं होतं. दरम्यान या संपूर्ण वादावर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

    मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना किशोरी पेडणेकर यांना या वादासंबंधी प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सांगितलं की, बीकेसीत मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी माझ्यासोबत शाखाप्रमुख आणि दोन कार्यकर्ते होते. कार्यक्रम असताना मी मोबाइल माझ्याकडे ठेवत नाही. तसंच माझ्या मोबाइलला लॉक नसतो. मोबाइल पाहत असताना शिवसैनिकाने हे ट्विट केलं होतं.

    नेमकं काय आहे ट्विट आणि प्रकरण :