महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती उत्तम, दोन दिवसानंतर ग्लोबल रुग्णालयातून डिस्चार्ज

दोन दिवसांपूर्वी म्हणजे १८ जुलै रोजी किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुखायला लागले होते. त्यामुळे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. छातीत दुखू लागल्यामुळे वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्यात. दोन दिवसांच्या उपचारानंतर किशोर पेडणेकर यांची प्रकृती उत्तम असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती उत्तम असून त्या आज (२०जुलै) परळ येथील ग्लोबल रुग्णालयामधून सुखरूप घरी परतल्या आहेत. ग्लोबल रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या निरोपाला उत्तर देताना महापौर म्हणाल्या की, ग्लोबल रुग्णालय आपल्या नावाप्रमाणे येथे आलेल्या प्रत्येक रुग्णांची या आरोग्य मंदिरात चांगली सेवा करीत असून मी सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानते.

    दोन दिवसांपूर्वी म्हणजे १८ जुलै रोजी किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुखायला लागले होते. त्यामुळे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. छातीत दुखू लागल्यामुळे वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्यात. दोन दिवसांच्या उपचारानंतर किशोर पेडणेकर यांची प्रकृती उत्तम असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    किशोरी पेडणेकर यांना शनिवारी रात्रीपासूनच त्रास होत होता. छातीत दुखू लागल्याची तक्रार त्यांनी केली होती. मात्र, हा त्रास अधिक वाढल्याने रविवारी सकाळी त्यांना ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना रुग्णालयात दाखल करताच तातडीने विविध चाचण्या करण्यात आल्या. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर आज त्या सुखरुप घरी परतल्या आहेत.