लोकांचे बाप काढणाऱ्या महापौरांनी शहाणपण शिकवू नये : संदीप देशपांडे

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ असूनही ही अवस्था इथे आहे तर मुंबई शहराचं काय, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे. सोबतच किशोरी पेडणेकरांवरही टीका केली आहे. महापौर किशोरी पेडणेकर फक्त दावा करतात मात्र किती मॅनहोल्स सुरक्षित आहेत ते त्यांनी तपासावं. आमदारांनी इथून एक राऊंड मारावा. महापौर लोकांचे बाप काढतात त्यांनी जास्त शहाणपणा शिकवू नये, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

    मुंबई : पहिल्याच पावसाच्या दणक्यात मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळाली मनसेने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील 20 पेक्षा जास्त मॅनहोल्स उघडे असल्याचं मनसेने समोर आणल आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ असूनही ही अवस्था इथे आहे तर मुंबई शहराचं काय, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

    दरम्यान त्यासोबतच किशोरी पेडणेकरांवरही टीका केली आहे. महापौर किशोरी पेडणेकर फक्त दावा करतात मात्र किती मॅनहोल्स सुरक्षित आहेत ते त्यांनी तपासावं. आमदारांनी इथून एक राऊंड मारावा. महापौर लोकांचे बाप काढतात त्यांनी जास्त शहाणपणा शिकवू नये, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. मुंबईत पावसाच्या पाण्यामुळे होणाऱ्या अडचणीमुळे आता भाजपनेही शिवसेनेवर टीका केली आहे.

    तसेचं ‘हजारो कोटींचा खर्च करूनही मुंबईतील नालेसफाईचा प्रश्न सुटत नाही. मी सुद्धा काल मुंबईत अडकलो होतो. मुंबई तुंबई होतेय हे खरं आहे, असं सांगतानाच येत्या पालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.