वैद्यकीय प्रयोगशाळा मार्गदर्शक समितीत अवैध लॅब चालकांचा समावेश

सरकारी निर्णयानुसार, मार्गदर्शन तत्त्वे तयार करणाऱ्या समितीचे सदस्य अवैध लॅब धारक असतील तर रुग्णांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविणारे सुद्धा अवैधच ठरू शकतात वैद्यकीय प्रयोगशाळामधील तपासनीस आलेले अहवाल पॅथॉलॉजिस्टच सही करून देऊ शकतो .

  मुंबई : वैद्यकीय प्रयोगशाळा व्यवसाय मार्गदर्शक तत्त्वे ठरविणाऱ्या समितीत अवैध चालकांचा समावेश असल्याचा आराेप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजी संघटनेकडून होत आहे.

  ज्या लॅब तंत्रज्ञ चालवीत आहेत अशा लॅब अवैध ठरतात असे कायदा सांगत असेल तर मार्गदर्शक तत्वे ठरविणाऱ्या आरोग्य विभागाने स्थापन केलेल्या समितीत अवैध लॅब धारक कशाला हवेत असा सवालच या संघटनेकडून उपस्थित करण्यात आला आहे.

  सरकारी निर्णयानुसार, मार्गदर्शन तत्त्वे तयार करणाऱ्या समितीचे सदस्य अवैध लॅब धारक असतील तर रुग्णांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविणारे सुद्धा अवैधच ठरू शकतात वैद्यकीय प्रयोगशाळामधील तपासनीस आलेले अहवाल पॅथॉलॉजिस्टच सही करून देऊ शकतो .

  म्हणजेच अनुभवी पॅथॉलॉजिस्ट आणि पॅथॉलॉजी संघटनेचे प्रतिनिधी या समितीत असणे अपेक्षित असल्याचे मत महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजी संघटनेचे सदस्य डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

  तंत्रज्ञ पॅथॉलॉजिस्ट शिवाय लॅब चालवू शकत नाहीत. तरीही अवैध लॅबोरेटरी चालविण्याचा बोगस वैद्यक व्यवसाय सध्या सुरु आहे. यावर सरकारने स्थापन केलेल्या समितीत देखील त्यांच्या नेमणूक करण्यात आल्या असल्याच्या तक्रारी लॅब धारक करत आहेत.

  तंत्रज्ञ पॅथॉलॉजिस्ट शिवाय लॅब चालवीत असल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३ नुसार अवैध व्यवसाय म्हणून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे .

  यावर बोलताना महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड बायोलॉजीस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ . संदीप यादव यांनी सांगितले कि, आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या समितीत पाच अशासकीय सदस्य आहेत.

  ते अवैध लॅबोरेटरी चालविण्याचा व्यवसाय करीत आहेत. त्यांची चौकशी करून त्यांच्यावर महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३ नुसार अवैध वैद्यक व्यवसाय म्हणून कारवाई करावी अशी मागणी डॉ. यादव यांनी केली आहे.