उद्या राज्यभरातील वैद्यकीय सेवा बंद राहणार !

सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत आराेग्य सेवा बंद असणार आहेत. यात दवाखाने, ओपीडी, क्लिनिक अशा प्रा‌‌थमिक सेवा बंद राहतील, तर अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत,या बंदमुळे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांची काेणतीही गैरसाेय हाेणार नसल्याचे सांगितले आहे.

  • सीसीआयएमच्या अधिसूचनेला आयएमएचा विरोध; राज्यभरातील सव्वा लाख डाॅक्टर बंदमध्ये सहभागी सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत आराेग्य सेवा बंद

मुंबई: सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनकडून (सीसीआयएम) राजपत्रात अधिसूचना प्रकाशित केली असून या अधिसूचनेला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे. सीसीआयएमकडून प्रसारित करण्यात आलेल्या अधिसूचनेमुळे भावी डॉक्टरांच्या भविष्यावर परिणाम करणारी असल्याचे सांगण्यात येत आहे, याविराेधात इंडियन मेडिकल असोशिएशनने एल्गार पुकारला असून, त्यामुळे शुक्रवारी (१ डिसेंबर)महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय सेवा बंद राहणार आहे. या बंदमध्ये राज्यभरातील साधारण सव्वा लाख डाॅक्टर सहभागी हाेणार आहेत. शुक्रवारी रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा व अत्यावश्यक शस्त्रकि्रया सुरु राहणार, परंतु इतर प्रा‌‌‌थमिक सेवा बंद राहणार असल्याचे इंडियन मेडिकल असोशिएशनकडून सांगण्यात आले .

राज्यव्यापी पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये इंडियन मेडिकल असोशिएशनचे ४५ हजार डाॅक्टर, मार्ड, निवासी, सर्जन असे राज्यभरातील एकूण सव्वा लाख डाॅक्टर या बंदमध्ये सहभागी हाेणार आहेत. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत आराेग्य सेवा बंद असणार आहेत. यात दवाखाने, ओपीडी, क्लिनिक अशा प्रा‌‌थमिक सेवा बंद राहतील, तर अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत,या बंदमुळे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांची काेणतीही गैरसाेय हाेणार नसल्याचे इंडियन मेडीकल असोशिएशनचे अध्यक्ष डाॅ. अविनाश भाेंडवे यांनी सांगितले.

या अधिसूचनेत सीसीआयएमने ५८ शस्त्रक्रियांना शल्यतंत्र आणि शालाक्य तंत्र सांगून पदव्युत्तर शिक्षणात समाविष्ट केली आहेत. जनरल सर्जरी, युरॉलॉजी (मूत्ररोग शस्त्रक्रिया), सर्जिकल गॅस्ट्रोएंटरॉलॉजी, ( पोटाच्या आणि आतड्याच्या शस्त्रक्रिया) इ.एन.टी. (नाक-कान-घसा), ऑफ्थाल्मोलॉजी (नेत्ररोग शस्त्रक्रिया) आणि डेंटिस्ट्री (दंतरोग शास्त्रक्रिया) यांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील १५० सरकारी आणि खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना समाविष्ट करणाऱ्या डॉक्टरांची ज्युनिअर डॉक्टर्स नेटवर्कही आंदोलन करणार आहे. याशिवाय या आंदोलनास महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर्स म्हणजे मध्यवर्ती मार्ड संघटनेने ही पाठिंबा दिला आहे.
आयएमए सदस्य ८ डिसेंबरपासून निदर्शने करत असून ११ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर वैद्यकीय सेवा बंद करण्यात येणार आहे. कोविड सेवा वगळता बंद राहतील. आपत्कालीन सेवा, अपघात, प्रसूतीगृहे, आपत्कालीन शस्त्रक्रिया या सेवा सुरु राहणार आहे. केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास राष्ट्रीय आयएमए सर्वोच्च न्यायालयात, राज्य आयएमए शाखा उच्च न्यायालयात, तर स्थानिक आयएमए शाखा संबंधित जिल्हा न्यायालयांमधील खटले दाखल करतील असा इशारा ही देण्यात आला आहे.