haffkine institute

गेल्या दहा महिन्यांपासूनची हाफकीनकडे(haffkine institute) साधारणत: १०३ कोटी रूपयांची थकबाकी आहे, ‘‘बिलाची पूर्ण रक्कम दिल्याशिवाय औषध पुरवठा( no medicine supply to haffkine) करणार नाही, थकीत बिलाची रक्कम द्या’’,असा इशारा देत साेमवार मध्यरात्रीपासून औषध पुरवठादारांनी हाफकीनला औषध पुरवठा करणे बंद केले आहे.

मुंबई: गेल्या दहा महिन्यांपासूनची हाफकीनकडे(haffkine institute) साधारणत: १०३ कोटी रूपयांची थकबाकी आहे, ‘‘बिलाची पूर्ण रक्कम दिल्याशिवाय औषध पुरवठा( no medicine supply to haffkine) करणार नाही, थकीत बिलाची रक्कम द्या’’,असा इशारा देत साेमवार मध्यरात्रीपासून औषध पुरवठादारांनी हाफकीनला औषध पुरवठा करणे बंद केले आहे. दरम्यान, मंगळवारी हाफकीनचे वरिष्ठ अधिकारी व औषध पुरवठादारांबराेबर झालेल्या चर्चेतही सकारात्मक ताेडगा निघाला नसल्याने औषध पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय ऑल फूड ॲन्ड ड्रग्ज लायसन्स हाेल्डर्स फाऊंडेशनने घेतला आहे. यामुळे रुग्णालयांवर औषध तुटवड्याचा परिणाम हाेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मंगळवारी हाफकीनचे वरिष्ठ अधिकारी व औषध पुरवठादारांबराेबर झालेल्या चर्चेत थकीत बिलाबाबत चर्चा झाली. यात २०१९-२० या वर्षाचे औषध खरेदी करण्याबाबतचे नवीन बजेट राज्य सरकारने दिले नसल्याने थकीत बिलाची रक्कम देणे शक्य नसल्याचे हाफकीनकडून सांगण्यात आले. औषध खरेदीचा फंड मिळण्यास अजून चार ते पाच दिवस लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. ज्यामुळे औषध पुरवठा न करण्याचा निर्णय औषध पुरवठादारांनी घेतला आहे. थकीत बिल पूर्ण केल्यानंतरच औषध पुरवठा केला जाईल, असे ऑल फूड ॲन्ड ड्रग्ज लायसन्स हाेल्डर्स फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.

बिलांचे पैसे चुकते करण्याची मागणी मागील काही महिन्यांपासून ऑल फुड ॲन्ड ड्रग लायसन्स हाेल्डर्स फाऊंडेशन सातत्याने करत आहे.
या संदर्भात पुरवठादारांनी अनेकदा निवेदने व आंदोलने केली. पुरावठादारांच्या मागणीला हाफकीन प्रशासनाकडून फारसा प्रतिसाद मिळत नाहीये, गेल्या १० महिन्यांतील थकीत बिलांमुळे पुरवठादारांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली असल्याचे पुरावठादार सांगतात. वैद्यकीय शिक्षण व संधोधन संचालनालय अंतर्गत २१ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. तर सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न ३४ छोटी-मोठी रूग्णालये आहेत. या रूग्णालयांना लागणारी औषधे हाफकीन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विकत घ्यावी लागतात. औषध पुरवठा बंद झाल्याने या वैद्यकीय महाविद्यालये तसेच रुग्णालयांत औषधांचा तुटवडा होऊ शकतो.