लोकलबाबत आज बैठक! सर्वसामान्यांना मूभा मिळण्याची शक्यता

रविवारी बेस्टच्या मदतीला धावणाऱ्या एसटीची सेवा संपल्यानंतर सोमवारपासूनच बेस्ट बसेसवर ताण आला आहे. तर दुसरीकडे मुंबई दुसऱ्या स्तरावर असतानाही निर्बंध मात्र तिसऱ्या स्तरावरील कायम आहेत. त्यातही मंगळवारी मुंबईकरांना दिलासादायक देणारी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. मुंबई लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकार गुरूवारी महत्त्वाची बैठक घेऊन मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील रुग्णसंख्येचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती काकाणी यांनी दिली.

  मुंबई : रविवारी बेस्टच्या मदतीला धावणाऱ्या एसटीची सेवा संपल्यानंतर सोमवारपासूनच बेस्ट बसेसवर ताण आला आहे. तर दुसरीकडे मुंबई दुसऱ्या स्तरावर असतानाही निर्बंध मात्र तिसऱ्या स्तरावरील कायम आहेत. त्यातही मंगळवारी मुंबईकरांना दिलासादायक देणारी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. मुंबई लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकार गुरूवारी महत्त्वाची बैठक घेऊन मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील रुग्णसंख्येचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती काकाणी यांनी दिली.

  राज्यात ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत लॉकडाऊनमध्ये ७ जूनपासून राज्य सरकारने निर्बंध शिथिल करण्यात आले. पाच टप्प्यांमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट ५.२५ वरून ४.४० खाली आला आहे. मुंबईचा समावेश दुसऱ्या स्तरावर आहे. परंतु, तरीही येथे तिसऱ्या स्तराचे नियम लागू आहेत. मुंबईत सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू आहे. मात्र सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेतल्यानंतरच होणार आहे.

  मुंबईत एमएमआर क्षेत्रातून मोठ्या संख्येने लोकं नाेकरीनिमित्त तसेच इतर कारणांमुळे येत असतात. त्यामुळे लोकल सुरू करण्यापूर्वी मुंबईतच नव्हे तर संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रातील कोरोना स्थितीवर विचार करावा लागणार आहे. गुरूवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेलसह इतर भागातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकार निर्णय घेईल. आढावा बैठकीनंतर सर्वसामान्यांना लोकल सुरू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मंत्रिमंडळातील विजय वडेट्टीवार यांनी सांिगतले होते की, जोपर्यंत मुंबई पहिल्या स्तरात येत नाही, तोपर्यंत सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू केली जाणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.

  लोकलबाबत तर राज्य सरकारने मुंबई शेजारील भागांबाबतही निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. गेल्या आठवड्यात सर्वांसाठी लोकल सुरू झाली नाही, कारण पावसाळ्यात रुग्णसंख्या वाढू शकतील, हा तर्क दिला जात होता. त्यामुळे लोकल सुरू करण्याबाबत रिस्क घेतले नाही. मुंबईची रुग्णसंख्या आटोक्यात आहे, मात्र मुंबईत बाहेरून लोकं येतात, त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. परंतु, हे दोन्ही तर्क पाहता गेल्या १५ दिवसांत मुंबईत मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे पाऊस आल्यानंतर रुग्णसंख्या वाढीचा धोका कमी झाला आहे.

  मान्सून इफेक्ट

  तिसऱ्या लाटेचा धोका पाहता काही महिन्यांपर्यंत परिस्थिती सामान्य होईल, याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पहिल्याप्रमाणे दररोज ८० लाख प्रवासी हा आकडा खूपच दूर आहे. परंतु, ७ जूनपासून राज्य सरकारने निर्बंधात सवलत दिली आहे. त्यात मान्सूनची सुरूवाही झाली आहे. सुत्रांच्या मते, काही कार्यालयांमध्ये आयएमटीच्या माहितीच्या आधारे उपस्थिती निश्चित होत असते. मुंबईत पुढील ४८ तासांत मुसळधा पाऊस असेल तर कर्मचाऱ्यांना आधीच अलर्ट दिला जातो. त्यामुळे त्या दिवशी लोकलमध्ये अपेक्षेपेक्षा गर्दी कमी असते. ९ जून रोजी मध्य रेल्वेवर ६ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता.

  ७५ टक्के ऑक्सिजन खाटा हव्यात रिकाम्या

  मुंबईचा पॉझिटिव्हीटी दर ४.४० टक्के आहे आणि ऑक्सिजन खाटा २७ टक्क्यांपेक्षा जास्त भरलेल्या आहेत. त्यामुळे मंुबईला दुसऱ्या स्तरावर ठेवले पाहिजे होते. परंतु, पालिकेने सावधगिरी बाळगत मुंबईला तिसऱ्या स्तरावर ठेवले आहे. आता गुरूवारी महत्त्वाची बैठक झाल्यानंतर सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गुरूवारी मुंबईतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन खाटा २५ टक्क्यांपेक्षा कमी भरलेल्या अर्थात ७५ टक्के खाटा रिकाम्या असतील तर लोकल सुरू होण्याची शक्यता आहे.

  अशाप्रकारे वाढले प्रवासी

  ३ महिन्यांपूर्वी १ फेब्रुवारीला सर्वसामान्य प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मूभा मिळाली. १ फेब्रुवारी २०२१ पूर्वी दररोज सुमारे २० लाख प्रवासी प्रवास करत होते. महिलांना लोकलने प्रवास करण्याची मूभा मिळाल्यानंतर या संख्येमध्ये वाढ झाली. महिलांना नोव्हेंबर २०२० च्या दरम्यान काही अटी-शर्तींनुसार प्रवासाची मूभा मिळाली होती. २० नाव्हेंबरपूर्वी दररोज ९ ते १० लाख प्रवासी प्रवास करत होते.

  मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू केली तर गर्दी वाढेल, त्यामुळे स्थानकांवर गर्दी होणार नाही, यासाठी पर्याप्त उपाययोजना करण्यावर चर्चा करण्यात येणार आहे. गर्दी होणार नाही, यासाठी तोढगा काढण्यात येणार आहे.

  - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई पालिका
  हे सुद्धा वाचा