मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) आज बुधवारी (Wednesday)  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या स्थगितीबाबत आणि ही स्थगिती उठवण्याबाबतच्या पर्यायांवर चर्चा (Discuss) होणार आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) आज बुधवारी (Wednesday)  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या स्थगितीबाबत आणि ही स्थगिती उठवण्याबाबतच्या पर्यायांवर चर्चा (Discuss) होणार आहे. तसेच या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ हजार पोलीस भरतीबाबत (Police Recruitment) निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे ही बैठक मुंबईतल्या सह्याद्री या सरकारी गेस्ट हाऊसवर होणार आहे.

मराठा आरक्षण स्थगितीचे पडसाद राज्यसभेतही उमटले आहेत. मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी अशी मागणी सर्वपक्षीय खासदारांनी केली. तर दुसरीकडे खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. पवारांनी चार पर्याय सूचवले असून त्यापैकी कोणता पर्याय टिकू शकतो हे पाहावं लागेल असं छत्रपती संभाजीराजेंनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार,  मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय बैठक संध्याकाळी साडे सहा वाजता होणार आहे. यावेळी बैठकीत मराठा आरक्षणाच्या स्थगितीबाबत पुढील रणनीती काय असणार आहे ? हे ठरवलं जाणार आहे.