आशा गटप्रवर्तकांचा Covid च्या कामावर बहिष्कार; २४ सप्टेंबरपासून संपावर जाणार

आशा गतप्रवर्तकांनी कोरोना काळात शहरसह ग्रामीण भागात सुद्धा अगदी मनापासून सेवा केली आहे आणि त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मिळायला हवा याच मागणीसाठी आयटकच्या महिलांचा लढा सुरू असून माध्यमांना नाराजीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

    मुंबई (Mumbai) : आशा व गटप्रवर्तकांनी आज विशेष बैठक घेतली आणि कोविड काळात केलेल्या कामांचा योग्य मोबदला मिळण्याच्या मागणीसाठी आशा गतप्रवर्तक अनेक प्रयत्न करून सुद्धा त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील नसल्याचे दिसून येते. आशा गतप्रवर्तकांनी कोरोना काळात शहरसह ग्रामीण भागात सुद्धा अगदी मनापासून सेवा केली आहे आणि त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मिळायला हवा याच मागणीसाठी आयटकच्या महिलांचा लढा सुरू असून माध्यमांना नाराजीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

    राज्य शासनाने जुलै २०२० पासून आशांना २०००/- व गटप्रवर्तकांना मानधन वाढ मार्च 2021 पर्यंत देण्यात आली. परंतु एप्रिल 2021 ते ऑगस्ट २०२१ पाच महिन्याची राज्य शासनाची थकबाकी अजूनही दिली नाही. ती त्वरित मिळावी आशा व गटप्रवर्तकांना नुकतेच जुलै 2021 पासुन आशांना 1500 गटप्रवर्तकांना 1700 वाढ जाहीर करण्यात आली. परंतु अजूनपर्यंत देण्यात आली नाही.

    Covide कामासाठी केंद्र सरकार आशांना 1000/- व गटप्रवर्तकांना 500 मानधन दिले जात होते. परंतु शासनाने 1 सप्टेंबरपासून बंद केले त्यामुळे हा अन्याय दूर करत मागणी मान्य करण्यात यावी यासाठी वर्ध्यातील आयटक कर्मचाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत 24 सप्टेंबरला पुकारण्यात येणाऱ्या संपाची रूपरेषा ठरवण्यात आली.