रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी एकदा ही बातमी वाचून मगच निर्णय घ्या

सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३६ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT Mumbai) येथून सुटणारी डाऊन धीम्या (Down Slow) मार्गावरील सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद (Down Fast) मार्गावर वळविण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप स्थानकांवर थांबतील.

  मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेतर्फे आज देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी आपल्या उपनगरी विभागात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  मेन मार्ग (Main Line)

  माटुंगा – मुलुंड अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत

  सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३६ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणारी डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप स्थानकांवर थांबतील. पुढे या सेवा मुलुंड स्थानकात निर्धारित धीम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.

  सकाळी १०.२७ ते दुपारी ३.५५ या वेळेत ठाणे येथून सुटणारी अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार असून भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येईल.

  हार्बर मार्ग (Harbour Line)

  कुर्ला- वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० वाजेपर्यंत

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ या वेळेत वाशी/ बेलापूर/ पनवेलकरिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि वाशी – पनवेल विभागांत विशेष सेवा चालविण्यात येतील.

  हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ४.३० या वेळेत मेन लाइन आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  पश्चिम मार्ग (Western Line)

  पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल (लोकल) स्थानकांदरम्यान आज सकाळी १०.३५ वाजल्यापासून ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप तसेच डाऊन धीम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत अप तसेच डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन दिशेकडील काही उपनगरीय लोकल रद्द करण्यात येतील. ब्लॉक संबधित सविस्तर माहिती स्टेशन मास्तर कार्यालयात उपलब्ध आहे.

  Megablock today on all three routes of the railway; Only read this news once before you leave home and then make a decision