मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पश्चिम मार्गावरील प्रवाशांची त्रासातून मुक्तता

घाटकोपर येथून सकाळी १०.४० पासून दुपारी ३.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड व मस्जिद या स्थानकावर थांबणार नाहीत.

    मुंबई : मध्य रेल्वेवर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उपनगरी भागांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

    मेन लाईन

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ या दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविल्या जातील. या सेवा मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, विद्याविहार स्थानकावर थांबणार नाहीत व विद्याविहार येथे पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.

    घाटकोपर येथून सकाळी १०.४० पासून दुपारी ३.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड व मस्जिद या स्थानकावर थांबणार नाहीत.

    ब्लॉक कालावधीत मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार येथे सेवा उपलब्ध होणार नाहीत.

    हार्बर लाईन

    कुर्ला – वाशी अप व डाउन हार्बर मार्ग सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ दरम्यान वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा व तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ दरम्यान सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

    तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि वाशी – पनवेल विभागा दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

    हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० पर्यंत ब्लॉक कालावधीत मेन लाइन आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

    पश्चिम लाईन

    पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही असे पश्चिम रेल्वेने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.