आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आहे मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

परिणामी पनवेल ते वाशी, बेलापूर / नेरुळ ते खारकोपर वाहतूक बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी वाहतूकही सुरु राहणार आहे.

मुंबई : मध्य, पश्चिम आणि हार्बर  रेल्वे मार्गावरील देखभाल आणि दुरुस्तीसाठी आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान तिन्ही वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील  सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील धीम्या मार्गावर सकाळी  १०.५० ते दुपारी ३.५० पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरुन  वळविण्यात येणार आहे.

हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील रेल्वे मार्गावर ब्लॉक असणार आहे. या दरम्यान, सकाळी  ११.०५ ते दुपारी  ४.०५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे कामं केली जाणार आहेत. परिणामी पनवेल ते वाशी, बेलापूर / नेरुळ ते खारकोपर वाहतूक बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी वाहतूकही सुरु राहणार आहे.

तर, पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी  १०.३५ ते दुपारी ३.३५ दरम्यान दुरुस्ती करण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळवली जाणार आहे. तसेच दोन्ही दिशेकडील मार्गावरील काही लोकल  रद्द करण्यात आल्या आहेत.