रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३७ ते दुपारी २.४८ या वेळेत सुटणारी डाऊन जलद/अर्धजलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवली जाईल व त्यांच्या नियोजित वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

  रेल्वेच्या तिन्ही उपनगरी मार्गांवर आज मेगा ब्लॉक (Mega Block on all three routes of railway) परिचालित करण्यात येणार आहे.

  सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत ठाणे-कल्याण दरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सकाळी ९.३७ ते दुपारी २.४८ या वेळेत सुटणारी डाऊन जलद (Down fast)/अर्ध जलद सेवा (Semi Fast) ठाणे आणि कल्याण (Thane and Kalyan) स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर (Down Slow) वळवली जाईल व त्यांच्या नियोजित वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

  अप जलद/अर्धजलद मार्गावर कल्याण येथून सकाळी १०.२६ ते दुपारी ३.१९ दरम्यान सुटणाऱ्या सेवा कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील व नियोजित वेळापत्रकांपेक्षा १० मिनिटे उशीराने गंतव्य स्थानकांवर पोहोचतील.

  हार्बर मार्ग Harbour Line

  पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर लाईन सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत (बेलापूर-खारकोपर बीएसयू मार्ग वगळता)

  अप हार्बर मार्गावर (Up Harbour Line) पनवेल (Panvel) येथून सकाळी १०.४९ ते सायंकाळी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या (CSMT Mumbai) दिशेने जाणाऱ्या सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ या वेळेत पनवेल/बेलापूरसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  अप ट्रान्सहार्बर मार्गावर (Up Trans Harbour Line) पनवेल येथून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ या वेळेत ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या सेवा आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या सेवा बंद राहतील.

  उरण मार्ग Uran Line

  डाऊन बीएसयू मार्गावर नेरुळ येथून सकाळी १०.१५ ते दुपारी २.४५ या वेळेत खारकोपरला जाणारी सेवा आणि
  अप बीएसयू मार्गावर खारकोपर येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ३.१५ या वेळेत नेरुळला जाणाऱ्या सेवा रद्द राहतील.

  सेवा उपलब्ध

  ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी विभागात विशेष उपनगरी गाड्या चालविण्यात येतील.

  ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असतील.

  ब्लॉक कालावधीत बेलापूर-खारकोपर सेवा वेळापत्रकानुसार चालतील.

  पश्चिम मार्ग Western Line

  वांद्रे ते अंधेरी (Bandra to Andheri) स्थानकांदरम्यान दुपारी १.१५ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.१५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गांवर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.