mehul choksi

पंजाब नॅशनल बँकेला १३,४०० कोटींना गंडा घालून मेहुल चोक्सी आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी आपल्या कुटुंबकबिल्यासह देशातून पसार झालेले आहेत. यांच्या विरोधात ईडीने पीएमएल कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. तसेच सीबीआयदेखील यांच्या मागावर आहे. वारंवार चौकशीचे समन्स बजावूनही हे आरोपी भारतात येऊन न्यायालयापुढे आणि तपासयंत्रणेपुढे हजर होण्यास तयार नाहीत.

    मुंबई : पीएनबी बॅंक घोटाळ्यातील मुख्य आणि फरार आरोपी मेहुल चोक्सीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सत्र न्यायालयाने जारी केलेले निर्देश रद्द करण्यात यावेत, अशी मागणी चोक्सीने याचिकेतून केली असून त्याच्या याचिकेला विरोध करत अंमलबजावणी संचालनालय(ईडी)ने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, सदर अर्जाची प्रत प्रतिवादींना न दिल्यामुळे न्यायालयाने ईडीवर नाराजी व्यक्त करत सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब केली.

    पंजाब नॅशनल बँकेला १३,४०० कोटींना गंडा घालून मेहुल चोक्सी आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी आपल्या कुटुंबकबिल्यासह देशातून पसार झालेले आहेत. यांच्या विरोधात ईडीने पीएमएल कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. तसेच सीबीआयदेखील यांच्या मागावर आहे. वारंवार चौकशीचे समन्स बजावूनही हे आरोपी भारतात येऊन न्यायालयापुढे आणि तपासयंत्रणेपुढे हजर होण्यास तयार नाहीत. त्यामुळे तपासयंत्रणेने साल २०१८ च्या फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आणि कायद्यानुसार चोक्सीची जप्त केलेल्या सर्व संपत्तीवर टांच आणण्याची प्रक्रिया सुरू केली. या कारवाईला विरोध करत चोक्सीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत ईडीच्या त्यास स्थगिती देण्याची मागणी केली आहे. त्याला विरोध करत ईडीनेही उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर गुरुवारी न्या. रेवती-मोहिते-डेरे यांच्यासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. मात्र, अर्जाची प्रत याचिकाकर्त्यांना दिली नसल्यामुळे आणि कायदेशीर कागदपत्रांची पूर्तात न झाल्यामुळे न्यायालयाने ईडीवर नाराजी व्यक्त करत याचिकेवरील सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब केली.