भाजपचे पालघरमध्ये मेरा आंगण….मेरा  रणांगण – महाराष्ट्र बचाव आंदोलन

देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णाची संख्या कमालीची वाढत चालली आहे. सरकार आरोग्य सेवा देण्यात तर अपुरी पडत आहेच त्या बरोबर पोलीस,नर्सिंग स्टाफ,सफाई कर्मचारी ,डॉक्टर

 देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णाची संख्या कमालीची वाढत चालली आहे. सरकार आरोग्य सेवा देण्यात तर अपुरी पडत आहेच त्या बरोबर पोलीस,नर्सिंग स्टाफ,सफाई कर्मचारी ,डॉक्टर ह्यांना कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी किट व इतर मेडिकल सामुग्री पुरेशी देण्यात अपयशी ठरत आहे. महाराष्ट्राचे माननीय मुखमंत्री फक्त जनतेला भावनिक भाषण देत आहेत . राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना या आपत्ती विरोधात लढण्यासाठी प्रभावी उपाययोजना करू न शकणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकार विरोधात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीने संपूर्ण राज्यात दिनांक २२ मे २०२० रोजी मेरा आंगण….मेरा  रणांगण – महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात  आले. 

भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याचे अध्यक्ष श्री.नंदकुमार ग पाटील ह्यांच्या नेतृत्वात दिनांक २२ मे २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता पक्षाचे  जिल्हा कार्यालय कचेरी रोड पालघर येथे तर भाजपच्या वाडा येथील जिल्हामध्यवर्ती कार्यालया समोर भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबाजी काठोले, संदीप पवार, उत्तेकर मॅडम आदी उपस्थित होते. इमारतीच्या परिसरात सोशल डिस्टन्नसिंगचे पालन करून,मास्क वापरून ,प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन केले .पाच कार्यकर्त्यांपेक्षा कमी कार्यकर्ते घेऊन हातामध्ये  ‘ठाकरे  सरकार हाय हाय’ , ‘उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार’

‘कोरोनाचा संकटाला जबाबदार ठाकरे सरकार चा भोंगळ कारभार’ अशा आशयाचे बोर्ड घेऊन तसेच काळ्या रंगाचा कपडा बांधून निषेध करत सदरचे आंदोलन करणार आले. ह्यावेळी पालघर जिल्हा अध्यक्ष श्री.नंदकुमार पाटील,जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील,सुजित पाटील ,प्रमोद आरेकर,समीर पाटील ,विजय तामोरे इत्यादी उपस्थित होते.

ज्या प्रमाणे संपूर्ण राज्यात , पालघर जिल्हा मुख्यलयात आंदोलन करण्यात आले त्याच प्रमाणे भारतीय जनता पार्टी चा पालघर जिल्हातील जवळ जवळ प्रत्येक पदाधिकारी,आणि कार्यकर्ते ह्यांनी आपापल्या घरी संपूर्ण कुटुंबासह असेच मेरा आंगण ….मेरा रणांगण … महाराष्ट्र बचाव आंदोलन केले. ह्या वेळी ही कोरोना महामारी बाबतचे शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. त्याच बरोबर दिनांक २० मे २०२० रोजी पालघर जिल्हाधिकारी  महोदयांना भाजपा पालघर जिल्हयाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.