metro carshande mumbai

सध्या मुंबईत गर्दीमुळे लोकल ट्रेनची सेवा कोरोना संसर्गाच्या भितीमुळे सामान्यांना बंद करण्यात आली आहे. परंतू नव्या वर्षाच्या सुरूवातीला मुंबईच्या लोकलसेवेतील गर्दी किमान १५ टक्के कमी होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो-२अ आणि मुंबई मेट्रो -७ हे दोन्ही मेट्रो मार्ग सुरु झाल्यावर पश्चिम द्रुतगती मार्गावरील २० ते २५ टक्के वाहतूक आणि १० ते १५ टक्के लोकलमधील गर्दी कमी होईल असा दावा, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. राजीव यांनी यांनी केला आहे. मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ हे दोन्ही मेट्रोचे मार्ग जानेवारी २०२२ पर्यंत  लोकांच्या सेवेत रूजू होतील असा विश्वास एमएमआरडीएचे आयुक्त आर. राजीव यांनी व्यक्त केला आहे.

    मुंबई, किशोर आपटे:  सध्या मुंबईत गर्दीमुळे लोकल ट्रेनची सेवा कोरोना संसर्गाच्या भितीमुळे सामान्यांना बंद करण्यात आली आहे. परंतू नव्या वर्षाच्या सुरूवातीला मुंबईच्या लोकलसेवेतील गर्दी किमान १५ टक्के कमी होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो-२अ आणि मुंबई मेट्रो -७ हे दोन्ही मेट्रो मार्ग सुरु झाल्यावर पश्चिम द्रुतगती मार्गावरील २० ते २५ टक्के वाहतूक आणि १० ते १५ टक्के लोकलमधील गर्दी कमी होईल असा दावा, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. राजीव यांनी यांनी केला आहे. मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ हे दोन्ही मेट्रोचे मार्ग जानेवारी २०२२ पर्यंत  लोकांच्या सेवेत रूजू होतील असा विश्वास एमएमआरडीएचे आयुक्त आर. राजीव यांनी व्यक्त केला आहे.

    पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्या पर्यंत सुरू

    या दोन्ही मेट्रोच्या एकूण २० किलोमीटर मार्गावर चाचण्या लवकरच सुरू होणार आहेत. या मेट्रो मार्गावर प्रवास करताना किमान १० रुपये भाडे आकारणार असल्याचे आयुक्त आर. राजीव यांनी स्पष्ट केले आहे. पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्या पर्यंत सुरू करण्याचा एमएमआरडीए चा प्रयत्न आहे. तर जानेवारी २०२२ पर्यंत मेट्रोचे दोन्ही मार्ग सुरू होतील असा विश्वास महानगर विकास प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ हे दोन्ही मेट्रोचे मार्ग जानेवारी २०२२ पर्यंत सुरू होतील असे आयुक्त आर राजीव यांनी व्यक्त केला आहे.

    पश्चिम द्रुतगती मार्गावरील २० ते २५ टक्के वाहतूक कमी

    या दोन्ही मेट्रो मार्गावर एकूण २० किलोमीटर मार्गावर चाचण्या लवकरच सुरू होणार आहेत. या मेट्रो मार्गावर प्रवास करताना किमान १० रुपये भाडे मोजावे लागणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. तर हे दोन्ही मेट्रो मार्ग सुरू झाल्यावर  पश्चिम द्रुतगती मार्गावरील २० ते २५ टक्के वाहतूक कमी होईल तर १० ते १२ टक्के लोकलमधील गर्दी कमी होईल असा दावा आर राजीव यांनी केला आहे.