ड्रायव्हरलेस टेक्नोलॉजी! एमएमआरडीएचे ‘मुंबई इन मिनिट्स’ हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार

मुंबई मेट्रोसाठी लागणारे कोच लवकरच चारकोपमध्ये दाखल होतील. त्यानंतर त्यांची चाचणी सुरू होईल. मे महिन्यात या दोन्ही मेट्रो सुरू होतील. दोन मेट्रोमध्ये अर्ध्या तासाचे अंतर असेल. कालांतराने मेट्रोची संख्या वाढवितानाच दोन मेट्रोंमधील वेळेचे अंतर कमी करण्यासाठी विचार केला जाईल.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ चे काम वेगाने सुरू असून, या मार्गासाठी लागणाऱ्या मेट्रो कोचचे अनावरण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते शुक्रवारी बंगळुरू येथे करण्यात आले. आता लवकरच या दोन्ही मार्गांसाठी लागणारे मेट्रो कोच मुंबईत दाखल होतील.

मुंबई मेट्रोसाठी लागणारे कोच लवकरच चारकोपमध्ये दाखल होतील. त्यानंतर त्यांची चाचणी सुरू होईल. मे महिन्यात या दोन्ही मेट्रो सुरू होतील. दोन मेट्रोमध्ये अर्ध्या तासाचे अंतर असेल. कालांतराने मेट्रोची संख्या वाढवितानाच दोन मेट्रोंमधील वेळेचे अंतर कमी करण्यासाठी विचार केला जाईल.

या मेट्रोसाठी काम करत असलेले अभियंते आणि तंत्रकुशल कामगार यांचा मला अभिमान असल्याचे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. आत्मनिर्भर भारताचे हेच खरे योद्धे असून, हेच भारताला पुढे घेऊन जाणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील महत्त्वाची केंद्रे मेट्रोमुळे जोडली जातील. पूर्व आणि पश्चिम उपनगर आणखी जवळ येईल आणि प्रवाशांचा सुखकर प्रवास आणि एमएमआरडीएचे ‘मुंबई इन मिनिट्स’ हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल, असा विश्वास एमएमआरडीएला आहे. तसेच मेट्रोची तिकीट ही १० ते ४० रूपयांपर्यंत असणार आहे.