MHADA's Hi-Fi Home Lottery in South Mumbai; The lottery will go out next year

घरे उपलब्ध नसल्याने यंदा म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत निघाली नाही. परंतु आगामी वर्षाच्या पहिल्याच महिन्यात मुंबई मंडळ सोडत काढण्याच्या विचारात आहे(Mhada Lottery). या सोडतीमध्ये मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून (आर. आर. मंडळ) मिळालेल्या दक्षिण मुंबईतील(South Mumbai) ६७ घरांचा समावेश होणार आहे. ही घरे आर. आर. मंडळाने मुंबई मंडळाला दिली असून सुमारे ७५० ते १२०० चौरस फुटाची ही घरे मुंबईकरांना बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध होणार आहेत.

    मुंबई : घरे उपलब्ध नसल्याने यंदा म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत निघाली नाही. परंतु आगामी वर्षाच्या पहिल्याच महिन्यात मुंबई मंडळ सोडत काढण्याच्या विचारात आहे(Mhada Lottery). या सोडतीमध्ये मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून (आर. आर. मंडळ) मिळालेल्या दक्षिण मुंबईतील(South Mumbai) ६७ घरांचा समावेश होणार आहे. ही घरे आर. आर. मंडळाने मुंबई मंडळाला दिली असून सुमारे ७५० ते १२०० चौरस फुटाची ही घरे मुंबईकरांना बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध होणार आहेत.

    सध्या म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ८ हजार ९८४ सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या सोडतीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. कोकण मंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जाची संगणकीय सोडत १४ ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये काढण्यात येणार आहे.

    या सोडतीनंतर मुंबई मंडळ सोडत काढणार आहे. या मुंबई मंडळाकडे यंदा घरे नसल्याने सोडत काढण्यात आली नाही. मात्र पुढील वर्षी पहाडी गोरेगाव येथील पहिल्या टप्प्यातील उपलब्ध होणाऱ्या घरांची सोडत काढण्याची मंडळाची तयारी सुरु आहे. गोरेगाव येथील ही घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत.

    याशिवाय विविध ठिकाणची विखुरलेली घरेही या सोडतीमध्ये असतील. तर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातून मिळालेली अतिरिक्त घरे मुंबई मंडळाला सोडतीसाठी देण्यात येतात. त्यानुसार पुढील सोडतीसाठी सुमारे ६७ घरे मुंबई मंडळाला देण्यात आली आहेत. सुमारे ७५० ते १२०० चौरस फुट आकाराची ही घरे मध्यम ते उच्च उत्पन्न गटांसाठी असणार आहेत. मात्र बाजारभावाच्या तुलनेत म्हाडाची घरे कित्येक पटीने कमी किमतीमध्ये उपलब्ध होणार असल्याने या घरांसाठी मोठी चुरस पाहण्यास मिळणार आहे.

    - अरुण डोंगरे, मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ