एमएचटी सीईटीचे अर्ज घटले ! बारावीचा निकाल वाढूनही फारसा परिणाम नाही

  मुंबई (Mumbai) : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या (engineering, pharmacology and agriculture courses) प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटीसाठी (the MHT-CET) गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सव्वा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी (The enrollment) कमी झाली आहे. बारावीचा निकाल (the results of class XII) वाढूनही विद्यार्थी फारसे फिरकलेले नाहीत.

  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (the State Common Entrance Examination) राज्यातील अभियांत्रिकी, वैद्यकीय (medical), औषध निर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी घेण्यात येते.

  कोरोना काळ असूनही आणि प्रवेश प्रक्रिया उशिरा होवूनही गतवर्षी ५ लाख ४२ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यंदा बारावीच्या निकाला अगोदर अर्ज नोंदणी तसेच मुदतवाढ देवूनही ४ लाख २४ हजार ७७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी कमी झाल्याचे कारण मात्र कोरोना काळ असल्याचे अधिकाऱ्यांंकडून सांगितले जात आहे.
  —————————————————————————————-
  एमएचटी सीईटी           अर्जनोंदणी
  २०१९-२०        ——     ५,४२,४३१
  २०२०-२१        ——     ४२४७७३