Not 4 crore 20 lakhs but 350 crores; ED's shocking revelation about Anil Deshmukh's property

क्लाऊडमधील काही तांत्रिक बाबींचा कालावधी संपल्याने ते पुन्हा नव्याने समाविष्ट करण्यासाठी २०१८ मध्ये फेरफार करण्यात आला होता. मार्च २०२० मध्ये आणखी दोन कोटीची तर नोव्हेंबर २०२० मध्ये आणखी आठ कोटीची वाढ करण्यात आली होती. या प्रस्तावाबाबत भाजपने काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले आहेत. या मुद्दयावर निरसन करण्याच्या अटीवर हा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे.

    मुंबई : मुंबई महापालिकेची संगणक प्रणाली ‘क्लाऊड’वर आणि नंतर या प्रणालीत विविध प्रकारच्या तांत्रिक बाबींचा समावेश केला जाणार आहे. यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटात तब्बल चौथ्यांदा फेरफार होणार आहे. त्यामुळे मुळचे ३८ कोटीचे हे कंत्राट आता तब्बल ५५ कोटींवर गेले आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली आहे.

    पालिकेचे विविध विभाग ऑनलाईन जोडणे, ‘सॅप’ प्रणालीचे ‘हाना’ या नवीन प्रणालीवर स्थलांतर व इतर नवीन अॅप्लीकेशनसाठी हा फेरफार केला जाणार आहे. यासाठी आणखी सुमारे सात कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळे हे कंत्राट आता ५४ कोटी ७५ लाखांच्या घरात गेले आहे. मे. कंट्रोलएस कंपनीला ऑगस्ट २०१६ पासून जुलै २०२१ पर्यंत ३८ कोटी ८९ लाखांना हे कंत्राट देण्यात आले होते.