‘मिलाप’ची निधीसाठी सुविधा मोफत उपलब्ध

विविध घटकातील वंचित वर्गासाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. मात्र अशा अनेक संस्थाना बहुतांश वेळा निधीची कमतरता भासत असते. अशाच संस्थाना आता यापुढे निधीची कमतरता भासू नये यासाठी निधी उभारणारी संस्था `मिलाप` तर्फे मोफत निधी उपलब्ध केला जाणार आहे.

मुंबई : विविध घटकातील वंचित वर्गासाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. मात्र अशा अनेक संस्थाना बहुतांश वेळा निधीची कमतरता भासत असते. अशाच संस्थाना आता यापुढे निधीची कमतरता भासू नये यासाठी निधी उभारणारी संस्था `मिलाप` तर्फे मोफत निधी उपलब्ध केला जाणार आहे. येत्या सणासुदीच्या दिवसांसाठी हे मोफत व्यासपीठ उपलब्ध करून देत जास्तीत जास्त लोकांना त्यांना हवी असलेली मदत तातडीने मिळवता येईल. ही संकल्पना भारतात प्रथमच अमलात येत असल्याची माहिती  ‘मिलाप’चे सह-संस्थापक व कार्यकारी संचालक मयूख चौधुरी यांनी दिली.

आज कोरोना काळात अनेक सामाजिक संथा गरजू लोकांसाठी काम करीत आहेत. मात्र आर्थिक डबघाईमुळे अनेक संस्थाना देणगी व निधी उभारण्यास अनेक अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर व्यक्तिगत कारणांसाठी निधी जमा करणारे तसेच धर्मादाय संस्थांना ५ टक्के फी द्यावी लागत होती. आता सर्व धर्मदाय संस्थाना ‘मिलाप’च्या मोफत व्यासपीठ सुविधेचा लाभ घेता येणार आहे.  सामाजिक चळवळ उभारणाऱ्या घटकांना त्यांच्या उद्धिष्टांमध्ये यश मिळावे, सुरक्षित पद्धतीने, विनासायास, तात्काळ आणि अधिकाधिक विश्वसनीय निधी उभारता यासाठी `मिलाप’ने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ३० लाखांहून जास्त देणगीदार या व्यासपीठाचा वापर करतात असेही चौधुरी यांनी सांगितले.