थकीत वेतन मिळण्याकरीता एसटी कर्मचाऱ्यांचा शिवलिंगावर दुग्ध अभिषेक ! शासनाला सुबुद्धी मिळो

कोरोना सारख्या संकट काळात आपली सेवा बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मागील १५ दिवसांपासून वेतन मिळालेले नाहीत. ७ जून रोजी मिळणारा पगार महिना अखेरपर्यत मिळालेल नाहीये. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्यामध्ये प्रचंड असंताेष पसरला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना थकित वेतन त्वरित मिळावे यासाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी कांग्रेसच्यावतीने राज्य सरकारला मागील काही दिवसांपासून पत्रव्यवहारही करण्यात आला होता. ज्यामुळे ६०० कोटी रुपयांचा निधीही शासनाकडून मंजूर करण्यात अाला आहे. मात्र,आतापर्यत हा निधी महामंडळाकडे वर्ग झालेला नाही. त्यामुळे वेतन त्वरित मिळावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी शिवलिंगावर दुग्ध अभिषेक घालून शासनाकडे संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न मंगळवारी करण्यात आला.

    मुंबई: कोरोना सारख्या संकट काळात आपली सेवा बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मागील १५ दिवसांपासून वेतन मिळालेले नाहीत. ७ जून रोजी मिळणारा पगार महिना अखेरपर्यत मिळालेल नाहीये. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्यामध्ये प्रचंड असंताेष पसरला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना थकित वेतन त्वरित मिळावे यासाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी कांग्रेसच्यावतीने राज्य सरकारला मागील काही दिवसांपासून पत्रव्यवहारही करण्यात आला होता. ज्यामुळे ६०० कोटी रुपयांचा निधीही शासनाकडून मंजूर करण्यात अाला आहे. मात्र,आतापर्यत हा निधी महामंडळाकडे वर्ग झालेला नाही. त्यामुळे वेतन त्वरित मिळावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी शिवलिंगावर दुग्ध अभिषेक घालून शासनाकडे संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न मंगळवारी करण्यात आला.

    ९७ हजार कर्मचाऱ्यांमध्ये असंताेष

    कोरोनामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला आहे. त्यामुळे कामगारांना पगार देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नव्हते. परिणामी कामगारांचे वेतन थकीत होते. त्यामुळे गेल्या वर्षी एसटी बस वाहतूक बंद असताना शासनाकडून मिळालेल्या १ हजार कोटी रुपयांच्या निधीतून कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले होते. मात्र, आता हा निधी सुद्धा संपला असून कर्मचाऱ्यांचा वेतनाचा आणखी प्रश्न निर्माण झालेला आहे सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांचा ७ तारखेला होणारा पगार झालेला नसल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

    महाराष्ट्र एसटी कर्मचारी कांग्रेस संघटनेने केलेल्या प्रयत्नामुळे शासनाने ६०० कोटी रुपये निधी मंजूरही केला आहे. पण तरीही तो एसटी महामंडळाकडे वर्ग झालेला नसल्याचे कर्मचारी सांगतात. त्यामुळे महामंडळातील ९७ हजार कर्मचारी आणि अधिकारी यांचे वेतन थकीत असल्याचे सांगण्यात आले.

    शासनाला सुबुद्धी मिळो

    मंगळवारी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने कर्मचाऱ्यांनी मुंबई सेंट्रल येथे कोरोना प्रादुर्भाव संबंधित सर्व नियमांचे पालन करून महादेवाच्या पिंडीवर दुग्ध अभिषेक करीत ‘शासनाला सुबुद्धि मिळो आणि पगार लवकरात लवकर होऊ दे, असे सकाळी साकड़े घातले. तसेच शासनाला प्रतिकात्मक संदेश देण्यात आला.

    शासनाला देण्यात आलेल्या संदेशानंतर अचानक शासनाकडून ३०० कोटी रुपये एसटीकडे वर्ग करण्याचा आदेश प्राप्त झाले. तर हा निधी शासनाकडून मिळणारच होता. पण तो आज पर्यंत एसटी महामंडळाकडे वर्ग झाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे. हा निधी तात्काळ मिळावा यासाठी महादेवाला घातलेला अभिषेक हा प्रतीकात्मक होता. यातून शासन व एसटी प्रशासन याना संदेश पोहोचविण्याचा उद्देश होता अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.