‘एनसीबीने समीर खानला खोट्या केसमध्ये अडकवले’ मंत्री नवाब मलिक यांचा आरोप

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांचे जावई समीर खान यांच्या अटक प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपावरून पर्दाफाश केला. एनसीबीच्या छाप्यात 200 किलो गांजा मिळाला नाही. साडेसात ग्रॅमचा गांजा फर्निचरवालाकडे मिळाला. बाकी सर्व गोष्टी हर्बल टोबॅको आहेत हे रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्य आहे.

    क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने केलेली कारवाई बोगस असल्याचं सांगत अनेक मोठे गौप्यस्फोट करणारे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची सुरुक्षा आता वाढवण्यात आली आहे. नवाब मलिक यांना आता वाय प्लस सुरक्षा दिली जाणार आहेत. दरम्यान, नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत एनसीबीवर जेव्हापासून बोलतोय, तेव्हापासून मला धमकीचे फोन येत आहेत, असं नवाब मलिक म्हणाले.

    नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांचे जावई समीर खान यांच्या अटक प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपावरून पर्दाफाश केला. एनसीबीच्या छाप्यात 200 किलो गांजा मिळाला नाही. साडेसात ग्रॅमचा गांजा फर्निचरवालाकडे मिळाला. बाकी सर्व गोष्टी हर्बल टोबॅको आहेत हे रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्य आहे. अशा संस्थांकडे इन्स्टंट लेव्हलला टेस्ट करण्याचे किट्स असतात. गांजा नसतानाही लोकांना फ्रेम करण्यात आलं. हे मी सांगत नाही तर कोर्टाचा रिपोर्ट सांगत आहे. 27 अ हे कलम लागू होत नाही. जो काही खटला फर्निचरवाल्यावर लागतो. पण त्याला लगेच जामीन दिला. हर्बल तंबाखू सापडल्यानंतरही लोकांना फ्रेम केलं जात आहे. सिलेक्टिव्ह खबर लिक करून लोकांना बदनाम करण्याचं काम एनसीबी करत आहे. एनसीबी फ्रेम करण्याचं काम करत आहे. एनसीबी फर्जिवाडा करत आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.

    नवाब मलिक म्हणाले, 6 तारखेला पत्रकार परिषद घेत मी एनसीबीच्या विरोधात काही प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी माझ्या जावायवर भाजपने प्रश्न उपस्थित केले. 13 जानेवारीला समीर खानला अटक झाली होती. भाजपचे नेते नवाब मलिक यांचा जावई ड्रग डीलर आहे असे सांगत बदनामी करत होते. 27 तारखेला कोर्टाने करण सजदानी आणि राहीला फर्निचरवाला यांना साडेआठ महिन्यांनी जामीन दिला. त्याची लेखी ऑर्डर काल ऑनलाईन लोड करण्यात आली ती आम्ही वाचून पहिली. माझ्या घरातले बाहेर पडत नाही, मानसिक आघात झाला आहे.