चार बंदुकधारी, पायलट कार आणि…  मंत्री नवाब मलिकांना आता वाय प्लस सुरक्षा; ठाकरे सरकारने केली सुरक्षेत वाढ

क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण पथकाच्या संपूर्ण कारवाईला बोगस ठरविण्याचा दावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Minister Nawab Malik ) यांना धमक्या आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांची सुरक्षा राज्य सरकारने वाढविली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार आता नवाब मलिक यांना वाय प्लस सुरक्षा सुरक्षा( Y Plus security) व्यवस्था देण्यात आली आहे.

  मुंबई : क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण पथकाच्या संपूर्ण कारवाईला बोगस ठरविण्याचा दावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Minister Nawab Malik ) यांना धमक्या आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांची सुरक्षा राज्य सरकारने वाढविली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार आता नवाब मलिक यांना वाय प्लस सुरक्षा सुरक्षा( Y Plus security) व्यवस्था देण्यात आली आहे.

  चार बंदुकधारी, पायलट कार संरक्षणाचा फौजफाटा

  गृहविभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार नवाब मलिक यांच्या वाय प्लस सुरक्षेनुसार आता चार बंदुकधारी जवान, पायलट कार अश्या संरक्षणाचा फौजफाटा असणार आहे. मलिक यांच्या घरीही चार जवान तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याआधी नवाब मलिकांच्या सुरक्षेत केवळ एक जवान होता. मात्र आता मुंबई क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी एनसीबीवर गंभीर आरोप केल्यानंतर ही सुरक्षा वाढविण्यात आली असल्याचे समजते.

  क्रूझवर टाकलेला छापा बोगस

  मलिक यानी आरोप केले आहेत की, शाहरुखला टार्गेट करायचे हे आधीच ठरले होते. एनसीबीने क्रूझवर टाकलेला छापा बोगस होता. क्रूझवरून कोणत्याही प्रकारे नशेच्या पदार्थाचा साठा सापडला नाही. ड्रग्ज साठ्याचे फोटो एनसीबी कार्यालयातील आहेत. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला पद्धतशीरपणे यात गोवण्यात आले आहे. शाहरुखला टार्गेट करायचे हे आधीच ठरले होते आणि त्यानुसार पुढे संपूर्ण कारवाई केली गेली, असे अनेक दावे नवाब मलिक यांनी केले आहेत.

  भाजप पदाधिका-यांच्या सहभागाचा आरोप

  भाजप पदाधिकारी मनीष भानुशाली आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेला व स्वत:ला खासगी गुप्तहेर म्हणवणारा किरण गोसावी हे दोघे कारवाईत एनसीबी अधिकाऱ्यांसोबत कसे काय सहभागी झाले होते?, असा गंभीर सवालही मलिक यांनी विचारला होता.