bacchu kadu

पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू दुचाकीद्वारे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. ते अमरावतीतील गुरुकुंज मोझरी येथून शेतकऱ्यांसह दुचाकी, ट्रॅक्टर आणि ट्रकसह दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

अमरावती : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कृषी कायदे (Farmer Bill) पारित केले आहेत. त्यामुळे देशातील शेतकरी आक्रोश करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पंजाब हरियाणाचे शेतकरी आंदोलन करत  आहेत. हे शेतकरी आता दिल्लीत पोहोचले आहेत. केंद्र सरकारने लादलेले कृषी कायदे रद्द करण्यात यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी पंजाब, हरियाणाचे गेल्या आठवड्यापासून रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लाच्या सीमेवर हे शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनाला राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही पाठिंबा ( support the farmers) दिला आहे. (Minister of State Bachchu Kadu)

पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू दुचाकीद्वारे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. ते अमरावतीतील गुरुकुंज मोझरी येथून शेतकऱ्यांसह दुचाकी, ट्रॅक्टर आणि ट्रकसह दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले आहे. देशातील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. सरकारकडून या विषयावर अद्यापही कोणता तोडगा काढला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याची समजते आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतोय याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.