Minister of State for Education Bachchubhau Kadu held a meeting with parents regarding school problems in Mumbai division
शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी मुंबई विभागातील शाळा समस्यांबाबत पालकांसोबत घेतली बैठक

मुंबई : कोरोना महामारी (covid 19) मुळे सध्या अर्थचक्र मंदावले आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. अनेकांनी आपला रोजगार (jobs) गमावला आहे. संसाराचा गाडा हाकताना प्रत्येकाला दोन हात करावे लागत आहे. सध्या कोरोनामुळे शाळा विरुद्ध पालक(Parents against school)  असा संघर्ष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे. शाळा पालकांना मुलांची फी भरण्यासाठी सक्ती करताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून शिक्षण राज्यमंत्री (Minister of State for Education) बच्चूभाऊ कडू (Bachchubhau Kadu) यांनी पालकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.

शाळांमध्ये पालक सध्या विविध समस्यांना तोंड देत आहेत, ज्यात शाळा फी, ऑनलाइन शिक्षणात मुलांना सहभागी करून न घेणे, संस्था चालकांची मनमानी, शाळा सुरू नसतानाही स्कूल बसची फी घेणे, पालक संघांची स्थापना न करणे, विद्यार्थी दाखला न देणे, इत्यादी पालकांच्या समस्या आहेत.

 

राज्यमंत्री #बच्चू_कडू यांनी मुंबईतील शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांना जास्त फी घेणाऱ्या शाळांचे ७ वर्षाचे आर्थिक ऑडिट…

NavaRashtra यांनी वर पोस्ट केले गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

 

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी मुंबईतील शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांना जास्त फी घेणाऱ्या शाळांचे ७ वर्षाचे आर्थिक ऑडिट करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, या बैठकीचे आयोजन प्रहार विद्यार्थी संघटना अध्यक्ष ॲड. मनोज टेकाडे व प्रहार जनशक्ती पक्ष मुंबई संपर्क प्रमुख ॲड. अजय तापकीर यांनी केले होते, या बैठकीत पालक संघाचे अध्यक्ष जयंत जैन, तुळस्कर, सुनील चौधरी, उपस्थित होते.