सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले ‘हे’ सूचक विधान

लोकल ट्रेनबाबत कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा लागणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करणं अपेक्षित आहे. चर्चेनंतर जो काही निर्णय घेण्यात येईल याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः जनतेला देतील- विजय वडेट्टीवार

    मुंबई: दुसऱ्या लाटेत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य सरकारनं मुंबईमधील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन(Local Train) बंद केली. पंरतु मागील काही आठवड्यापासून कोरोनाची (Corona)रुग्णासंख्या कमी झाली आहे तसचे दुसरी लाटही ओसरलयात जमा आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेनचा प्रवास नेमका कधी सुरु होणार असा प्रशा सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

    मात्र ‘ सध्या राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र कोरोना विषाणूचा धोका अद्याप कमी झालेला नाही. दररोज नव्यानं कोरोनाबाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या अजूनही मोठी आहे. पहिल्या लाटेत जो कोरोना रुग्णांचा उच्चांक होता, त्या आकड्यावर सध्या कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोकाही वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत वस्तुस्थितीचा योग्य आढावा घेतल्यानंतरचं निर्बंध हटवण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येतील ‘ असे सूचक विधान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलं आहे.

    लोकल ट्रेनबाबत कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा लागणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करणं अपेक्षित आहे. चर्चेनंतर जो काही निर्णय घेण्यात येईल याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः जनतेला देतील, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत. सद्यस्थितीला केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकलची सेवा सुरु आहे.