मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली दत्तक घेतलेल्या मुलीला लग्नासाठी आर्थिक मदत…

मंत्री यशोमती ठाकूर यांनी काही वर्षांपूर्वी दत्तक घेतलेल्या पायल रडके या मुलीचा आता विवाह होत आहे. पायलच्या लग्नासाठी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आता आर्थिक मदत सुद्धा केली आहे. पायलला आपल्या पायावर उभे राहता यावे यासाठी तिची जबाबदारी यशोमती ठाकूर यांनी घेतली होती. तसेच इतर वेळीही तिला मदत केली. आता पायल आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करत असताना तिला शुभेच्छा देत ठाकूर यांनी तिला मदत केली.

    मुंबई : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी काही वर्षांपूर्वी दत्तक घेतलेल्या पायल रडके या मुलीचा आता विवाह होत आहे. पायलच्या लग्नासाठी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आता आर्थिक मदत सुद्धा केली आहे. पायलला आपल्या पायावर उभे राहता यावे यासाठी तिची जबाबदारी यशोमती ठाकूर यांनी घेतली होती. तसेच इतर वेळीही तिला मदत केली. आता पायल आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करत असताना तिला शुभेच्छा देत ठाकूर यांनी तिला मदत केली.

    दरम्यान पायल ही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. रामा गावात राहणाऱ्या पायलच्या आई आणि वडिलांनी काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर अनाथ झालेली पायल आपल्या मामाकडे राहत आहे. पायलचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी यशोमती ठाकूर यांनी घेतली होती. पायलच्या नवीन आयुष्यात तिला सर्व सुख लाभो, अशी प्रार्थना ठाकूर यांनी केली.

    तसेचं कोरोना संकटात अनेक बालकांचे आई-वडिल किंवा एका पालकाचे निधन झाल्याने ते अनाथ झाले आहेत. अशा मुलांच्या संगोपनाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सरकारने या मुलांसाठी मदतीची योजनाही जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी अनेक दिवसांआधीच अनाथ झालेल्या मुलीची जबाबदारी घेत सामाजिक जबाबदारीचा आदर्श घालून दिला आहे.