mira bhayander municipal corporation

मीरा भाईंदर महानगरपालिका(mira bhayander municipal corporation) मधील तीन अधिकाऱ्यांची सहाय्यक आयुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे. नगरविकास विभागाचे अपर सचिव नवनाथ वाठ यांनी शासन निर्णयाखाली मान्यता दिली आहे. यामुळे ज्या अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानी रंगेहाथ पैसे घेतानी पकडले त्यांची सहाय्यक आयुक्त पदी नेमणूक झाल्याने शहरात एकच चर्चा रंगली आहे.

  मीरा भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका(mira bhayander municipal corporation) मधील तीन अधिकाऱ्यांची सहाय्यक आयुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे. नगरविकास विभागाचे अपर सचिव नवनाथ वाठ यांनी शासन निर्णयाखाली मान्यता दिली आहे. यामुळे ज्या अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानी रंगेहाथ पैसे घेतानी पकडले त्यांची सहाय्यक आयुक्त पदी नेमणूक झाल्याने शहरात एकच चर्चा रंगली आहे.

  मीरा भाईंदर महानगरपालिका मधील वर्ग दोनचे अधिकारी दिलीप जगदाळे, संजय दोंदे, सुनील यादव यांना सहाय्यक आयुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे. नगरविकास विभागाकडून तशा प्रकारांचे आदेश जारी करण्यात आले आहे.मात्र ज्या अधिकाऱ्यांची नेमणूक देण्यात आली आहे. संजय दोंदे, दिलीप जगदाळे, सुनील यादव यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे घेतना रंगेहाथ अटक केली होती.

  पालिकेतील वादग्रस्त अधिकारी म्हणून यांची ओळख आहे. या तिन्हीही अधिकाऱ्यांवर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात दावा देखील प्रलंबित आहे. त्यामुळे मीरा भाईंदरचे आयुक्त दिलीप ढोले यांनी सहाय्यक आयुक्त पदासाठी प्रस्ताव पाठवला त्यामध्ये यांची नोंद होती का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.

  राज्य शासनाच्या नियमानुसार ज्यां अधिकारी कर्मचारी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे किंवा न्यायालयात दावा प्रलंबित आहे. अशा अधिकाऱ्यांना जबाबदारीच्या पदावर नियुक्ती करू नये. तसेच त्यांना पदोन्नती देताच येत नाही मात्र आयुक्त दिलीप ढोले यांनी सहायक आयुक्त पदी देण्यासाठी महानगरपालिका अधिनियम ४५ (३) नुसार मान्यतेसाठी पाठवला होता. सदरील प्रस्ताव नगरविकास विभागाकडून नियमित करण्यात आले आहे.

  मिरा भाईंदर महानगरपालिकेत आता पर्यंत पंधरा अधिकाऱ्यांना रंगेहाथ लाच घेताना अटक करण्यात आली आहे.असे असताना देखील त्या अधिकाऱ्यांना पुन्हा त्याच पदावर रुजू करण्यात आले आहे. त्यामुळे लाच घेणे हे काही मोठी गोष्ट नसल्याचे पालिकेकडून दर्शवण्यात येत आहे. शिवाय आपल्या हक्क्कारिता किंवा न्यायाकरिता लढणाऱ्या नागरिकांनी नेमका न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.मी रा भाईंदरला लागलेली लाचखोरांची किड कधी संपणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

  ज्या अधिकाऱ्यांना ACB ने पैसे घेतना पकडले आहे,या अधिकाऱ्यांचे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना यांना सहाय्यक आयुक्त पदी बढती देण्यात आली आहे.अत्यंत चुकीचं आहे हा राज्य सरकारच्या नियमाचा अवमान असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते रोहित सुवर्णा यांनी दिली.

  दहा वर्षांपासून हे तिन्हीही अधिकारी सहाय्यक आयुक्त म्हणून काम करत आहेत.ही पदोन्नती नसून फक्त सहाय्यक आयुक्त म्हणून शासनाने नियमित केले आहे.त्याला मान्यता नगरविकास खात्याने दिला आहे.

  दिलीप ढोले,आयुक्त, मीरा भाईंदर महानगरपालिका