sharad patil back in congress

शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील(Sharad Patil Back in Congress) यांची आज काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे.

  मुंबई : महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) सरकरसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेसने नेहमीच सत्तेत राहून तक्रारीचा पाढा कायम ठेवला आहे. आता स्वबळाची भाषा करत सत्तेतून कधीही बाहेर पडण्याची वक्तव्येदेखील केली जात असताना शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील(Sharad Patil Back in Congress) यांची आज काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे.

  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रा पाटील यांच्यासह माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्यांसह असंख्य सदस्य काँग्रेस पक्षात परतले आहेत.

  फास्ट फूडची क्रेज कमी करण्यासाठी आता पालकांनीच पौष्टिक आहाराचा आग्रह धरायला हवा तरच येणारी पिढी सशक्त असेल, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...

  शरद पाटलांची काँग्रेसमध्ये घरवापसी
  मूळचे काँग्रेसी असलेले प्रा पाटील पक्षाकडून दुर्लक्षित झाल्याने शिवसेनेत जाऊन २००९ मध्ये धुळे ग्रामीण (तत्कालीन कुसुम्बा) मतदारसंघातुन निवडून आले होते. त्यावेळी प्रा पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रोहिदास दाजी पाटील यांचा पराभव केल्याने जायंट किलर ठरले होते. प्रा पाटील यांनी युवक बिरादरी च्या माध्यमातून जिल्ह्यात युवकांची बांधणी केली आहे.

  दरवर्षी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री रक्तदान करण्याचा विक्रम प्रा पाटील यांच्या नावावर आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रा. शरद पाटील आज स्वगृही परतत आहेत. प्रा पाटील यांच्यामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

  उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला
  पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम केले पाहिजे. उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल यासाठी काम करा असे, आवाहन करून शरद पाटील यांच्यासह पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे त्यांनी काँग्रेस परिवारात स्वागत केले.

  धुळे जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेसमय
  यावेळी बोलताना विधिमंडळ पक्षाचे नेते तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल उत्तम सुरु असून काँग्रेसला महाराष्ट्रात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी सुरु केलेल्या प्रयत्नांसाठी सर्वजण त्यांच्यासोबत आहेत. भाजपाला कंटाळून अनेक जण काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून आजचा पक्षप्रवेश पाहता धुळे जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेसमय होण्याची सुरवात झाली असल्याचे चित्र दिसत आहे, असेही थोरात म्हणाले.