rohit pawar

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन प्रभाव असणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला पुनर्जीवन करण्यासाठी शाश्वत सक्रिय धोरण आखण्याची गरज आहे. दुर्दैवानं केंद्र सराकर याला प्रतिसाद देताना केवळ बुडणाऱ्या जहाजाची छिद्र बुजवताना दिसत आहे.

मुंबई : कोरोनामुळे (Corona Virus) देशावर मोठे आर्थिक संकट (Financial Crisis) उभे ठाकले आहे. त्यामुळे त्याचा सर्वाच पक्षांना आर्थिक फटका बसला आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलली पाहिजेत. अशी मागणीही सर्वच पक्षांकडून केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार  (Rohit Pawar) यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. रोहित पवार यांनी कोरोनाचे गंभीर परिणाम आर्थिक परिस्थितीवर होणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे केंद्राने परिणामकारक आर्थिक धोरण आखण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन प्रभाव असणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला पुनर्जीवन करण्यासाठी शाश्वत सक्रिय धोरण आखण्याची गरज आहे. दुर्दैवानं केंद्र सराकर याला प्रतिसाद देताना केवळ बुडणाऱ्या जहाजाची छिद्र बुजवताना दिसत आहे. यात अनुभवाचा अभाव स्पष्टपणे दिसत आहे. असे त्यांनी म्हटले आहे.