I dont know anything about Eknath Khadses entry in ncp says Ajit Pawar

ऐन थंडीत राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याचा गौप्यस्फोट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुराळा उडवून दिला. तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षात मेगा भरती होणार असल्याची घोषणा केली आहे. अंतर्गत विरोधातूनच महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असा दावा विरोधकांकडून वारंवार करण्यात येतोय. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजकीय गौप्यस्फोट करत आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई :  आमच्याकडे सध्या १०५ आमदार असले तरी त्याचे १५० आमदार कसे होतात, हे मी सांगण्याची गरज नाही असे म्हणत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला अवतान देण्याचा प्रयत्न केला. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजकीय बॉम्ब टाकत भाजप नेत्यांचे टेन्शन वाढवले आहे.

ऐन थंडीत राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याचा गौप्यस्फोट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुराळा उडवून दिला. तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षात मेगा भरती होणार असल्याची घोषणा केली आहे. अंतर्गत विरोधातूनच महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असा दावा विरोधकांकडून वारंवार करण्यात येतोय. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजकीय गौप्यस्फोट करत आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

मंगळवारी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरून झालेल्या चर्चेत बोलताना अजित पवार यांनी भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याचा दावा केला होता.

आमच्याकडून तुमच्याकडे गेलेत ते कधी राजीनामा देतील आणि आमच्याकडे येऊन निवडून येतील ते सांगता येत नाही, त्यांच्यावर लक्ष ठेवा, असा टोलाही अजित पवारांनी भाजपला लगावला. आता पाहा पुढील चार महिन्यात भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या गोटात सामील होतील’, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

भाजपमधले दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, लवकरच राष्ट्रवादीत मेगाभरती होणार असल्याचे संकेत जयंत पाटील यांनी आहेत.

राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपने विशेष कामगिरी केली नाही. त्यामुळे येत्या काळात भाजपच्या कामगिरी कशी असेल याबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.