भाजप आमदार अतुल भातखळकर यांना मुंबई पोलीसांनी घेतलं ताब्यात

कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी परिसरातील घरांवर शनिवारी सकाळी कारवाई करण्यात आली. कारवाई सुरू झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांना याला विरोध केला. यावेळी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनीही घरांची पाडापाड सुरू असलेल्या ठिकाणी पोहचून कारवाईला विरोध सुरू केला. कारवाईला विरोध केल्याप्रकरणी भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. याप्रकरणी भातखळकर यांनीही ट्वीट करून माहिती दिली असून, ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

  मुंबईत कुरार मेट्रो स्टेशनच्या कामाला विरोध करणाऱ्या रहिवाशांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजप आमदार अतुल भातखळकर यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी परिसरातील घरांवर शनिवारी सकाळी कारवाई करण्यात आली. कारवाई सुरू झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांना याला विरोध केला. यावेळी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनीही घरांची पाडापाड सुरू असलेल्या ठिकाणी पोहचून कारवाईला विरोध सुरू केला. कारवाईला विरोध केल्याप्रकरणी भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. याप्रकरणी भातखळकर यांनीही ट्वीट करून माहिती दिली असून, ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

  हे सुध्दा वाचा

  “काय माहित रात्री कुणाला अटक झाली तर..” भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य

  काय म्हणाले भातखळकर?

  “एमएमआरडीएच्या प्रकल्पासाठी कोणतीही नोटीस न देता घरं तोडण्यात येत आहेत. त्याला आम्ही विरोध केला होता. काल रात्री १२ वाजता नोटिसा देऊन आज सकाळी ९ च्या आधीच प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. भर पावसात कारवाई सुरू करण्यात आली. लोकांना मारहाण करत घराच्याबाहेर काढलं. आम्ही त्याला विरोध केला. त्यामुळे आम्हाला ताब्यात घेतलं. पोलिसी दंडुका दाखवत स्थानिकांना ताब्यात घेऊन मोगलाई पद्धतीने आमच्यावर कारवाई करण्यात आली. पण आमचा लढा सुरू राहील. हे बांधकाम आम्ही होऊ देणार नाही. आम्हाला योग्य घरं मिळाली पाहिजेत. झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन झालंच पाहिजे.” असं भातखळकर यांनी सांगितलं.

  दरम्यान, गिरगाव येथील बाधितांना जागेच्या इतकीच जागा स्थानिक ठिकाणी देऊन पुनर्वसन करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना घेतला होता; त्याच धर्तीवर मालाड पूर्व येथील बाधितांचे सुद्धा पुनवर्सन झाले पाहिजे, अशी मागणी अतुल भातखळकर यांच्याकडून करण्यात आली होती.

  हे सुध्दा वाचा

  ठाकरेंच ‘राज’कारण : अमित ठाकरे असतील मनसेच्या विद्यार्थी सेनेचे नवे अध्यक्ष?