mns aggressive on marathi language app issue about amazon and flipkart

अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्टने (Flipcart) सात दिवसांमध्ये मराठी भाषेचा पर्याय (Marathi Language Option) त्यांच्या अ‍ॅपवर (App) आणावा अन्यथा मनसे स्टाईल (MNS) समाचार घेतला जाईल अशी तंबी मनसेतर्फे देण्यात आली आहे. या कंपन्यांनी दक्षिण भारतातल्या भाषांना (South Indian Languages) प्राधान्य दिलं आहे. तिथे त्यांच्या 'राजभाषेत' अ‍ॅप सुरु केलं अशाच पद्धतीचं अ‍ॅप महाराष्ट्रात (Maharashtra) मराठी भाषेत सुरु करावं अन्यथा या कंपनीचा दिवाळीचा सण (Diwali Festival) 'मनसे स्टाइल' साजरा होईल असा इशाराही मनसेने दिला आहे.

  • मनसे नेते अखिल चित्रे यांनी काल दिली या दोन्ही कार्यालयांना भेट

मुंबई : अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने सात दिवसांमध्ये मराठी भाषेचा पर्याय त्यांच्या अ‍ॅपवर आणावा अन्यथा मनसे स्टाईल समाचार घेतला जाईल अशी तंबी मनसेतर्फे देण्यात आली आहे. या कंपन्यांनी दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य दिलं आहे. तिथे त्यांच्या ‘राजभाषेत’ अ‍ॅप सुरु केलं अशाच पद्धतीचं अ‍ॅप महाराष्ट्रात मराठी भाषेत सुरु करावं अन्यथा या कंपनीचा दिवाळीचा सण ‘मनसे स्टाइल’ साजरा होईल असा इशाराही मनसेने दिला आहे. मनसे नेते अखिल चित्रे यांनी काल या दोन्ही कार्यालयांना भेट दिली. तसेच सध्या तरी चित्रे यांनी सभ्य भाषेत त्यांचे कान टोचले आहेत.

आजपासून अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्हींचा फेस्टिव्हल सेल सुरु होत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही अनेक उत्पादनांवर मोठी सूट देण्यात येणार आहे. शिवाय या दोन्ही कंपन्यांच्या वेगवेगळ्या डिल्सही पुढे येत आहेत. अ‍ॅमेझॉनने १६ तारखेपासून प्राइम मेंबर्ससाठी तर १७ ऑक्टोबरपासून नॉन प्राइम मेंबर्ससाठी सेलचं आयोजन केलं आहे.

आता फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनला मनसेने मराठीत अ‍ॅप आणण्याचा इशारा दिला आहे. ज्याप्रमाणे या कंपन्यांनी दक्षिण भारतातील भाषांना प्राधान्य देऊन त्या राजभाषेत अ‍ॅप सुरु केलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत अ‍ॅप सुरु करावं असंही नमूद केलं आहे.

सात दिवसांच्या आत मराठीत अ‍ॅप सुरु केलं नाही तर या दोन्ही कंपन्यांची दिवाळी मनसे स्टाइल होईल असाही इशाराही मनसेने दिला आहे.दरम्यान अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांनी याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र दाक्षिणात्य भागांमध्ये तेथील भाषांनुसार अ‍ॅप सुरु केलं जात असेल तर महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.