मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मुंबईकर हैराण, मनसेचे आंदोलन ; प्रशासनाचे लक्ष वेधले

कांजूरमार्ग मनसुख नाला येथे महापालिकेकडून एक कलव्हर्ट बांधण्यात आले यावर एक रस्ता बांधण्यात आला होता, साधारण ८ कोटी ३३ लाख खर्च करून हे कल्व्हर्टचे काम करण्यात आले होते. या रस्त्यावरुन पादचारी किंवा वाहन मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात.

    मुंबई – मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मुंबईकर हैराण आहेत. या खड्ड्यांवरून मनसेने पालिकेविरोधात कांजूरमार्ग येथे चक्क खड्डे असलेल्या रस्त्यांवर आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

    कांजूरमार्ग मनसुख नाला येथे महापालिकेकडून एक कलव्हर्ट बांधण्यात आले यावर एक रस्ता बांधण्यात आला होता, साधारण ८ कोटी ३३ लाख खर्च करून हे कल्व्हर्टचे काम करण्यात आले होते. या रस्त्यावरुन पादचारी किंवा वाहन मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात. कांजूर स्टेशन आणि कांजूर गाव याठिकाणी जाणार हा एकमेव रस्ता आहे. मात्र सध्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे.

    पावसाळ्या आधी पालिकेकडून या रस्त्यावर डांबर देखील टाकण्यात आले होते, ते अल्पावधीतच उकरले असून खड्डेमय रस्ते झाले आहेत. यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पालिकेला स्थानिकानी पत्रव्यवव्हार करून दुर्लक्ष केले गेल्याने मनसेकडून त्या रस्त्यावर आंदोलन करण्यात आले.