मुंबईतील कोविड सेंटरच्या कामात महापौरांकडून घोटाळा, मनसेचा आरोप

मुंबईतील कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलाला मिळवून दिल्याचा गंभीर आरोप मनसेनं केला आहे. साईप्रसाद पेडणेकर यांच्या कंपनीने गैरमार्गाने काम मिळवल्याचा आरोपही संदीप देशपांडे यांनी केला आहे. कोविड इमर्जन्सी आणि इ टेडरिंगच्या नावाखाली हा घोटाळा बीएमसीकडून करण्यात आला असून याची तक्रार महापालिका लेखापाल, लोकायुक्त, मुख्यमंत्री यांच्याकडे मनसे करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.

मुंबई : कोरोना रूग्णांसाठी मुंबईत उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या उभारणीत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घोटाळा केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. मुंबईतील कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलाला मिळवून दिल्याचा गंभीर आरोप मनसेनं केला आहे. साईप्रसाद पेडणेकर यांच्या कंपनीने गैरमार्गाने काम मिळवल्याचा आरोपही संदीप देशपांडे यांनी केला आहे.  कोविड इमर्जन्सी आणि इ – टेडरिंगच्या नावाखाली हा घोटाळा बीएमसीकडून करण्यात आला असून याची तक्रार महापालिका लेखापाल, लोकायुक्त, मुख्यमंत्री यांच्याकडे मनसे करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.

कोरोना संकटाच्या काळात कुणीही राजकारण करू नये. सगळ्यांनी सहकार्य करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार करत होते. इतर पक्षही त्यावेळी कोरोनाच्या संकटाशी लढण्यात व लॉकडाऊनमुळे अडचणी आलेल्या जनतेला धीर देण्याच्या कामात व्यग्र होते. मात्र, महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना त्यावेळी भ्रष्टाचार करण्यात गुंतली होती असं आमच्या निदर्शनास आलं आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.

वरळी व इतर कोविड सेंटर मधील कामंही या कंपनीला देण्यात आली आहेत. तसेच काही एनजीओची काम सुद्धा दिली आहेत. त्यामुळे कोविडच्या नावावर हा भ्रष्टाचार झालेला आम्ही विसरणार नाही. महापौर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केली आहे.