गणेशाेत्सवात राजकीय पक्षांची निवडणुकीची माेर्चेबांधणी – मुंबईत निर्बंध झुगारून सण दणक्यात साजरा करण्याचा मनसे आणि भाजपचा निर्धार

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निर्बंध लादले तरीही निर्बंध झुंगारून गणेशाेत्सव दणक्यात साजरा करण्याचा निर्धार मनसे(MNS And Bjp Will Celebrate Ganeshotsav Without Following Rules) आणि भाजपने केला आहे.

    मुंबई: काेराेनाचे(Corona) विघ्न अजून संपलेले नाही. त्यात गणेशाेत्सवाच्या(Ganeshotsav 2021) तयारीसाठी लाखाे हात राबत आहेत. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निर्बंध लादले तरीही निर्बंध झुंगारून गणेशाेत्सव दणक्यात साजरा करण्याचा निर्धार मनसे(MNS And Bjp Will Celebrate Ganeshotsav Without Following Rules) आणि भाजपने केला आहे. आगामी पालिका निवडणुक डाेळ्यसमाेर ठेवून सर्वच राजकीय पक्ष गणेशाेत्सवाची संधी साधून माेर्चेबांधणी करण्याच्या तयारीत आहे. या निवडणुकीत हा उत्सव राजकीय आखाडा हाेण्याची आणि सत्ताधारी पक्ष आणि विराेधी पक्षांमध्ये स्पर्धा रंगण्याची दाट शक्यता आहे.

    मुंबईतील गणेशाेत्सवाला विशेष महत्व आहे. यंदाही मुंबईत सव्वा लाख मूर्तींची तर सार्वजनिक सुमारे अकरा हजार मूर्तींची प्रतिष्ठापना हाेणार आहे. सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांना मूर्तीच्या उंचीचे निकष तसेच काेराेनामुळे साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे निर्बंध राज्य सरकारने लावले आहेत. मात्र भाजप आणि मनसे या दाेन्ही पक्षांनी निर्बंध डावलून गणेशाेत्सव जल्लाेषात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विराेधकांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. गणेशाेत्सव काळात राज्य सरकारने सार्वजनिक गणेशाेत्सवाच्या ठिकाणी निर्बंधांबाबत कडक अंमलबजावणी केल्यास विराेधक आक्रमक हाेण्याची दाट शक्यता आहे. दहिहंडी उत्सवाबाबत मनसे आणि भाजपने राज्य सरकारच्या भुमिकेला विराेध करीत दहिहंड्या उभारल्या हाेत्या. नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे अनेक दहिहंडी उत्सव मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आहे हाेते.

    काेराेनाच्या काळात शासनाने लागू केलेले निर्बंध सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांनी न पाळल्यास त्यांच्यावर कारवाई हाेण्याची दाट शक्यता आहे. दहिहंडी उत्सव मंडळांवर जशी कारवाई झाली तशी झाल्यास गणेशाेत्सव काळात झाल्यास विराेधक आक्रमक हाेण्याची दाट शक्यता आहे. सार्वजनिक उत्सव मंडळांची सहानुभूती मिळविण्याचा विराेधकांचा प्रयत्न राहण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने विराेधकांची तशी व्युव्हरचना हाेण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक गणेेशाेत्सव मंडळे आहेत. त्या उत्सव मंडळांना अधिक बळकटी देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न राहील. त्यामुळे या उत्सवात सर्वच राजकीय आपापल्या विभागात माेर्चेबांधणी करतील. निवडणुकीच्या तयारीला आता राजकीय पक्ष लागले असून उत्सवाची संधी साधून निवडणुकीची तयारी करू लागले आहेत. या उत्सवाला यंदा राजकीय रंग येण्याची शक्यता आहे.