उर्जा खात्यातील ‘वाझे’ मनसेने आणला समोर; ऊर्जा मंत्र्यांना दिला इशारा

माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मुंबईतील बार चालकांकडून महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यानंतर गृहविभागातच नाही तर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक पत्रकार परिषद घेत ऊर्जा खात्यावर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे.

  मुंबई : माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मुंबईतील बार चालकांकडून महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यानंतर गृहविभागातच नाही तर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती.

  मात्र, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक पत्रकार परिषद घेत ऊर्जा खात्यावर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे.

  ऊर्जा खात्यातही वसुलीसाठी वाझे?

  हा व्यक्ती महावितरणच्या संचालक पदावर नियुक्त आहे. ज्याचं काम कलेक्शन आहे. महाराष्ट्रातून कलेक्शन करुन द्यायचं हे काम आहे. याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याला 15 दिवसांची कोठडी सुद्धा झाली आहे. या व्यक्तीला बडतर्फ करण्यात आले होते आणि अशा व्यक्तीला पुन्हा कसं सेवेत घेतलं जातं. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं मनसेने पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं, ऊर्जा मंत्र्यांच्या सहमतीशिवाय या व्यक्तीची नियुक्ती होणं शक्य नाहीये. त्यामुळे ऊर्जा मंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं. आम्ही या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी लाचलुचपत विभागाकडे केली आहे.

  अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप

  दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच वसुलीचं हे काम सचिन वाझेला दिलं असल्याचंही म्हटलं होतं. गृहखात्याच्या अंतर्गत असलेल्या पोलीस दलातील सचिन वाझे याला अटक झाल्यावर त्यानेही न्यायालयाला दिलेल्या एका पत्रात गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण ताजे असताना आहे मनसेने आणखी एक वाझे ऊर्जा विभागात असल्याचं म्हणत एकच खळबळ उडवून दिली आहे.