
पश्चिम रेल्वेनं माहिती पत्रकं आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा, अशी मागणी मनसेनं केली आहे. मनसेच्या रेल्वे कामगार सेनेने परिपत्रकाद्वारे ही मागणी केली आहे. पश्चिम रेल्वेकडून विविध माहिती पत्रकं, जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही पश्चिम रेल्वे संबधातील माहिती प्रसिद्ध केली जाते. मात्र, या सर्व पत्रकं आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर केला जात नाही ही बाब मनसेने निदर्शनास आणून दिली आहे.
मुंबई : अॅमेझॉननंतर मनसेने आपला मोर्चा पश्चिम रेल्वेकडे वळवला आहे. जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी मनसेने केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही मनसेने दिला आहे.
पश्चिम रेल्वेनं माहिती पत्रकं आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा, अशी मागणी मनसेनं केली आहे. मनसेच्या रेल्वे कामगार सेनेने परिपत्रकाद्वारे ही मागणी केली आहे.
पश्चिम रेल्वेकडून विविध माहिती पत्रकं, जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही पश्चिम रेल्वे संबधातील माहिती प्रसिद्ध केली जाते. मात्र, या सर्व पत्रकं आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर केला जात नाही ही बाब मनसेने निदर्शनास आणून दिली आहे.
प्रत्येक राज्यांनुसार तिथली भाषा वापरणं केंद्र सरकारनं बंधनकारक केलं आहे. असं असतानाही मराठी भाषेचा वापर केला जात नसल्याचा आक्षेप मनसेनं नोंदवला आहे.
मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही मनसेने दिला आहे. आता मनसेच्या या मागणीवर पश्चिम रेल्वे काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पश्चिम रेल्वेने माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांची मागणी.@mnsadhikrut@WesternRly @Gmwrly @drmbct @srdombct pic.twitter.com/mFfr3SXbae
— महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना (@MNRKS_IR) December 26, 2020
दरम्यान, मनसेच्या ‘खळळ-खट्याक’ आंदोलनापुढे अॅमेझॉननं माघार घेत मराठी भाषेचा पर्याय देण्याची घोषणा केली आहे.