
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे आशिया खंडातील सर्वात जुने स्टॉक मार्केट आहे. आपणांस विनंती आहे की हे नाव बदलून मुंबई स्टॉक एक्सचेंज करावे. हे स्टॉक एक्सचेंज हा महाराष्ट्र आणि भारताचा अभिमान आहे आणि याचे नाव मुंबई स्टॉक एक्सचेंज असेच असले पाहिजे, असं ट्विट बाळा नांदगावकर यांनी केलंय.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे भारतातील सर्वात जुने एक्सचेंज असून त्याचे नाव बदलण्याची गरज असल्याचे मत मनसेकडून व्यक्त करण्यात आले आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विटरवरून ही मागणी केली आहे.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे आशिया खंडातील सर्वात जुने स्टॉक मार्केट आहे. आपणांस विनंती आहे की हे नाव बदलून मुंबई स्टॉक एक्सचेंज करावे. हे स्टॉक एक्सचेंज हा महाराष्ट्र आणि भारताचा अभिमान आहे आणि याचे नाव मुंबई स्टॉक एक्सचेंज असेच असले पाहिजे, असं ट्विट बाळा नांदगावकर यांनी केलंय.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे आशिया चे सर्वात जुने स्टॉक मार्केट आहे. आपणांस विनंती आहे की हे नाव बॉम्बे बदलून मुंबई स्टॉक एक्सचेंज करावे. हे स्टॉक एक्सचेंज हा महाराष्ट्र आणि भारताचा अभिमान आहे आणि याचे नाव “मुंबई स्टॉक एक्सचेंज” च असले पाहिजे.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) December 23, 2020
मनसेच्या या मागणीमुळे आता नव्या चर्चेला तोंड फुटलंय. सध्या बॉम्बे हे नावच अस्तित्वात नसल्यामुळे स्टॉक एक्सचेंजच्या नावातूनतही ते काढून काढणेच योग्य ठरेल, अशी भूमिका मनसे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तर मुंबई हे शहराचं अधिकृत नाव असल्यामुळे स्टॉक एक्सचेंजच्या नावामागेही बॉम्बेऐवजी मुंबई नाव असावं, असं या मागणीचं समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
मराठीच्या मुद्द्यावरून जन्माला आलेल्या मनसेनं मराठी पाट्यांच्या आंदोलनातून देशभर ओळख मिळवली होती. त्यानंतर मनसेची मराठी भाषेचा आग्रह धरणारी अनेक आंदोलनं गाजली होती. अमेझॉनच्या वेबसाईटवर मराठीचा वापर अनिवार्य हवा, या मागणीसाठी नुकतंच मनसेनं जोरदार आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता मनसेच्या वतीनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या नामांतराचा मुद्दा पुढं आणला गेलाय.
आता या मागणीला पुढं काय राजकीय स्वरूप येतं, ते पाहणं औत्सुक्याचं असेल. मराठीच्याच मुद्द्यावर मोठ्या झालेल्या सत्ताधारी शिवसेनेकडून या मागणीला कसा प्रतिसाद येतो, ते पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.