मनसे नेते अमित ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, रुग्णांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याची केली मागणी

सर्वसामान्यांची बिघडलेली स्थिती पाहता बहुतांश रुग्णांना खासगी वाहनाने प्रवास परवडत नाही. या खर्चीमुळे अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे गंभीर आजार असलेल्या रुग्णांना त्याच्या उपचारादरम्यान आधारासाठी सोबत नातेवाईकांची गरज पडते.

मुंबई : देशात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस वाढतच आहेत. राज्यात कोरोनाला रोखण्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गंभीर आजाराच्या रुग्णांना आणि नातेवाईकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी (requesting to allow patients to travel by train) अशी मागणी केली आहे.

अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र पाठविले (MNS leader Amit Thackeray’s letter to the Chief Minister) आङे. तसेच त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुव प्रसिद्ध केले आहे. या पत्रात त्यांनी अशी मागणी केली आहे की, गेल्या सहा महिन्यांच्या कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीती क्षयरोग, कर्करोग, यकृत, मूत्रपिंड, मेंदूविकार, अर्धांगवायू आणि मधूमेहासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना उपचार घेण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.


लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अशातच  या आजारांवरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात असतो. सध्या रुग्णांना उपचाराबरोबरच प्रवास खर्चाला तोंड द्यावे लागत आहे. असे अनेक आजार आहेत ज्यांच्या उपचारासाठी रुग्णांना आठवड्यातून दोन-तीन वेळा इतर वाहनांनी किंवा रुग्णवाहिकांनी प्रवास करावा लागतो.”

त्यामुळे सर्वसामान्यांची बिघडलेली स्थिती पाहता बहुतांश रुग्णांना खासगी वाहनाने प्रवास परवडत नाही. या खर्चीमुळे अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे गंभीर आजार असलेल्या रुग्णांना त्याच्या उपचारादरम्यान आधारासाठी सोबत नातेवाईकांची गरज पडते. अशावेळी सर्वसामान्य रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना उपचारादरम्यान खासगी वाहनाने प्रवास परवडणं शक्य नसल्याने त्यांना रेल्वेने प्रवासासाठी मुभा देणे गरजेचे आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी दिली जावी. अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे.