वरुण सरदेसाई भाचा आहे म्हणून त्याला एवढी सूट का ? मनसे नेते संदीप देशपांडेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

राज ठाकरे(Raj Thakre) यांच्या आदेशाप्रमाणे मनसेच्या(MNS) कार्यकर्त्यांनी दहीहंडी साजरी केली. मुख्यमंत्र्यानी(Chief Minister) आंदोलन करत असताना शिवसैनिकांना घरी बसायला का सांगितले नाही? वरुण सरदेसाईवर(Varun Sardesai) गुन्हा दाखल झाला का? तो भाचा आहे म्हणून एवढी सूट देता का? असे सवाल संदीप देशपांडे(Sandeep Deshpande) यांनी केले आहेत.

  मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या(Maharashtra Navnirman Sena) पदाधिकाऱ्यांकडून मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी (Dahihandi 2021) उत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे मनसे नेते बाळा नांदगावकर(Bala Nandgavkar Arrested) यांच्यासह काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या पार्श्वभूमीवर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे(Sandeep Deshpande Asked Questions To Chief Minister) यांनी जुहू येथे राडा करणारे युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाईवर गुन्हा दाखल का झाला नाही ? तो भाचा आहे म्हणून एवढी सूट आहे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला आहे.

  आंदोलन करताना शिवसैनिकांना सूट का?
  राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी दहीहंडी ठिकठिकाणी साजरी केली. मुख्यमंत्र्यानी आंदोलन करत असताना शिवसैनिकांना घरी बसायला का सांगितले नाही? वरुण सरदेसाईवर गुन्हा दाखल झाला का? तो भाचा आहे म्हणून एवढी सूट देता का? असे सवाल संदीप देशपांडे यांनी केले आहेत.

  नांदगावकर यांनी स्वत: दहीहंडी फोडली
  दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काळाचौकी मैदानात दहीहंडी फोडली. पोलिसांनी कितीही नोटिसा पाठवल्या तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असा निर्धार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला होता. तसेच आम्हाला उत्सव साजरा करू द्या नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर नांदगावकर यांनी स्वत: दहीहंडी फोडत हा उत्सव साजरा केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

  “मुख्यमंत्री म्हणतात हे स्वातंत्र्ययुद्ध आहे का? तर हो… हे स्वातंत्र्ययुद्धच आहे, एकेकाळी रँड नावाचा अधिकारीही असाच वागायचा. त्यावेळी चाफेकर बंधुंनी आवाज उठवला तशीच वेळ आता आली आहे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.