मनसे आमदार राजू पाटील यांनी मानले पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचे आभार, काय आहे कारण? : वाचा सविस्तर

हाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे जाहीर आभार मानले आहेत. कारण, डोंबिवलीमधील गांधीनगर नाल्यामध्ये एका कंपनीकडून केमिकलचे पाणी सोडले जात होते, त्यामुळे नाल्यातील पाणी विषारी होऊन त्याला हिरवा रंग आला होता. स्थानिक नागरिकांमधून याबाबत काहीतरी उपाययोजना केल्या जाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकाराची दखल घेत, संबंधिक कंपनीवर कारवाईचे निर्देश दिले व हा प्रकार थांबला. प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर कारवाई झाल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटद्वारे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

    मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे जाहीर आभार मानले आहेत. कारण, डोंबिवलीमधील गांधीनगर नाल्यामध्ये एका कंपनीकडून केमिकलचे पाणी सोडले जात होते, त्यामुळे नाल्यातील पाणी विषारी होऊन त्याला हिरवा रंग आला होता. स्थानिक नागरिकांमधून याबाबत काहीतरी उपाययोजना केल्या जाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. शिवाय, माध्यमांवर देखील या प्रकाराबाबतची बातमी आल्याने, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकाराची दखल घेत, संबंधिक कंपनीवर कारवाईचे निर्देश दिले व हा प्रकार थांबला. प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर कारवाई झाल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटद्वारे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

    राजू पाटील नेमकं काय म्हणाले?

    ”डोंबिवलीत प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर त्वरित कारवाई केल्याबद्दल नियंत्रण बोर्ड व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार. यापुढे पण प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध अशीच त्वरित व कठोर कारवाई होईल हीच अपेक्षा.” असं त्यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

    तर, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात आल्याने, केमिलक नाल्यात सोडण्याचा प्रकार थांबल्यानंतरचा नाल्यातील पाण्यात झालेल्या बदलाचा व्हिडिओ ट्विटद्वारे शेअर केला आहे.

    ”डोंबिवली गांधी नगर नाल्यात संभाव्य घातक सांडपाण्याची बातमी पाहताच एमपीसीबीने सदर कंपनीवर त्वरित कडक कार्यवाही केली आहे. महाराष्ट्राची पावन भूमी आम्ही प्रदूषित होऊ देणार नाही आणि प्रदूषण करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली जातील. कारवाई केल्यानंतरचा हा व्हिडीओ…” असं आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. तसेचं कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांनी देखील या प्रकाराची गंभीर दखल घेत, एमपीसीबी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या व संबंधित रायबो फार्म या कंपनीवर कारवाई झाली.