सुखी माणसाचा सदरा! राज ठाकरेंनी केले भरत जाधवचे कौतुक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी आज केदार शिंदेच्या (Kedar Shinde) नव्या मालिकेचं भरभरून कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांचं मराठी सिनेमा (Marathi Film) आणि रंगभूमीवरील प्रेम सर्वश्रुत आहे. ते स्वतः कलाकार असून त्यांना असलेली कलेच्या आवडीबद्दल सारेच जण जाणतात. राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवर दिग्दर्शक केदार शिंदे यांची नवी मालिका 'सुखी माणसाचा सदरा' याचा प्रोमो (Promo) शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी आज केदार शिंदेच्या (Kedar Shinde) नव्या मालिकेचं भरभरून कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांचं मराठी सिनेमा (Marathi Film) आणि रंगभूमीवरील प्रेम सर्वश्रुत आहे. ते स्वतः कलाकार असून त्यांना असलेली कलेच्या आवडीबद्दल सारेच जण जाणतात. राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवर दिग्दर्शक केदार शिंदे यांची नवी मालिका ‘सुखी माणसाचा सदरा’ याचा प्रोमो (Promo) शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, ही मालिका लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

ट्विटमध्ये काय म्हणाले राज ठाकरे

कोरोनाचं सावट आणि त्यामुळे आलेलं आर्थिक संकट ह्यामुळे सगळ्यांचा आनंदच कुठेतरी हरवला आहे. केदार शिंदेच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ ह्या लॉकडाऊननंतरच्या पहिल्या नव्या दूरदर्शन मालिकेमधून ते सुख, तो आनंद सापडेल किंवा सापडू दे असं मनापासून वाटतं. असं राज ठाकरे म्हणाले आहेत.