मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर, काय आहे मनसेची विशेष रणनीती ?

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये असल्याचं चित्र दिसत आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. 

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या (शुक्रवार) पुणे दौऱ्यावर असणार आहेत. राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहेत. तसेच शाखाध्यक्षांच्या निवडीची ते घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. महापालिकेच्या आगामी निवडणूकींवर मनसेची विशेष रणनीती काय असणार?, हे पाहणं सर्वांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

    राज ठाकरे यांनी 13 आणि 14 ऑगस्टला सुद्दा पुण्याचा दौरा केला होता. या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. तसेच बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे सहभागी झाले होते.

     मनसे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये

    पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये असल्याचं चित्र दिसत आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.