MNS soldiers broke the police cordon and traveled by train
मनसेचा गनिमी कावा, पोलिसांचा बंदोबस्त तोडून मनसे सैनिकांनी रेल्वेने प्रवास केलाच

मुंबई : लॉकडाउनमुळे (lockdown) गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा (local train service) ठप्प आहे. सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसेने सविनय आंदोलन (MNS civil movement) पुकारले आहे. मनसेचे नेते (mns leader) संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी गनिमी कावा करत लोकलने प्रवास करून आंदोलन केले आहे.

मुंबईत कोरोनाबाधितांची आकडेवारी लक्षात घेता मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून चालवली जात आहे. पण, यामुळे चाकरमान्यांना अतोनात हाल सहन करावे लागत आहेत. त्यामुळेच मुंबईतील लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी मनसेने केली होती.

मनसेने आज सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकावर कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु, तरीही पोलिसांना गुंगारा देऊन संदीप देशपांडे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकल गाठलीच. संदीप देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांनी गनिमी कावा करत लोकलमध्ये प्रवेश करून प्रवास केला. त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.

 

दरम्यान, नालासोपाऱ्यात मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे सेवा सुरू करावी यासाठी सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली आहे. आज सकाळपासून वसई विरार नालासोपारा परिसरात रेल्वे स्टेशनला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

वसई तालुक्यातील ६० ते ७० मनसे कार्यकर्त्यांना रात्री अकराच्या सुमारास नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. पण, तरीही आंदोलनावर मनसे ठाम आहे.