मनसेने तयार केलेली ही महाराष्ट्र रक्षक टीम राज यांचे संरक्षण करणार आहे. यापुढे ही टीम काळे टी-शर्ट्स घालून राज यांच्या आजूबाजूला दिसेल. राज ठाकरे ज्या-ज्या ठिकाणी जातील त्या सर्व ठिकाणी मनसेची ही महाराष्ट्र रक्षक टीम उपस्थित असेल.
मुंबई : राज्य सरकारने भाजप आणि मनसेतील अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. सुरक्षा कपात केल्यानंतर विरोधी पक्षांकडून महाविकास आघाडीवर टिकेची झड उडाली. परंतु आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा कपात केल्यानंतर मनसेचे सरचीटणीस नयन कदम यांनी सुरक्षतेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. नयन कदम यांनी राज ठाकरेंच्या संरक्षणासाठी खास ‘महाराष्ट्र रक्षक’ नावाची टीम तयार केली आहे.
महाराष्ट्र रक्षक टीम काय करणार?
मनसेने तयार केलेली ही महाराष्ट्र रक्षक टीम राज यांचे संरक्षण करणार आहे. यापुढे ही टीम काळे टी-शर्ट्स घालून राज यांच्या आजूबाजूला दिसेल. राज ठाकरे ज्या-ज्या ठिकाणी जातील त्या सर्व ठिकाणी मनसेची ही महाराष्ट्र रक्षक टीम उपस्थित असेल.
आगामी महानगरपालिका आणि सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज महत्त्वाची बैठक आहे. राज ठाकरे हे या बैठकीला उपस्थित असतील. यावेळीसुद्धा राज यांच्या संरक्षणासाठी हे महाराष्ट्र रक्षक तैनात असतील.