रेल्वे सेवा सुरु करा, अन्यथा..,मनसेचा सरकारला इशारा

बससेवा सुरू (Bus Service) करण्यात आली आहे. पण अद्याप रेल्वे सुरू न झाल्यामुळे विरोधक आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी यावरून थेट शासनाला ( MNS warns the government) इशारा दिला आहे.

मुंबई : राज्यात जनता कर्फ्यू (Curfew) लावूनसुद्धा कोरोनाचा धोका कमी होण्याचं नाव घेत नाही. अशात प्रत्येकाची आर्थिक बाजू लक्षात घेता आता राज्य अनलॉक-४ (Unlock-4) च्या प्रक्रियेत आहे. यादरम्यान, बससेवा सुरू करण्यात आली आहे. पण अद्याप रेल्वे सुरू न झाल्यामुळे विरोधक आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी यावरून थेट शासनाला ( MNS warns the government) इशारा दिला आहे.

लोकल लवकर सुरु करा अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे. विशेषतः उपनगरात राहून रोज कार्यालयासाठी मुंबईपर्यंत प्रवास करावा लागणाऱ्या नागरिकांकडून होत आहे. हीच मागणी उचलून धरत ‘रेल्वे सेवा सुरु करा, अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल’ असा इशारा संदीप देशपांडे यांनी बसमधील गर्दीचा एक व्हिडीओ शेअर करत दिला आहे.

बसच्या गर्दीत कोरोना होत नाही, पण रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का?? असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. खचाखच गर्दीने भरलेल्या बसचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.

लॉकडाऊन करताना शासनाने लोकांच्या वाहतुकीसाठी सोय केली नाही. नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. त्यांचे हाल कमी करण्यासाठी शासनाने लोकल सुरू करावी अन्यथा मी कायदा मोडेन असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.