raj thakre

मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे. माझं तोंड आणि माझ्या सहकार्यांचं काम आहे. पक्ष म्हणून नेता ओळखला जातो. एक राजकीय पक्षाचा नेता म्हणून बघितलं जातं. भारतात निवडणुका प्रतिकांवर होत असतात. लोकांनी मोदींना पाहून मतदान केलं. तर बाळासाहेबांना पाहून राज्यात सत्ता दिली, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. देशात जो लाट निर्माण करतो तो जिंकतो. तसंच झालं. सध्या कोरोनाच्या लाटेवर सगळे स्वार आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.

    मुंबई : आगामी महापालिका निवडणुकींत मनसे १०० टक्के सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलंय.एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हि घोषणा केली आहे. महापालिका निवडणुकींबाबत मनसेचा स्वत:चा एक कार्यक्रम असेल. इतकंच नाही तर मनसेची महापालिकेपर्यंतची वाटचाल ही एक पक्ष म्हणून असेल, असंही राज यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

    युती किंवा आघाडी करणार ?
    महापालिका निवडणुकीत मनसे युती किंवा आघाडी करण्याबाबत त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. ते म्हणाले, सध्या कोण कुठल्या बिळातून बाहेर येईल हे माहिती नाही. पण त्यावेळी आपल्या स्वत:चा म्हणजे मनसेचा एक कार्यक्रम असणारच. मनसेची महापालिकेपर्यंतची वाटचाल ही पक्ष म्हणून असेल. हा मला पत्र पाठवतोय का? तो मला डोळा मारतोय का? यावर माझी वाटचाल अवलंबून नसेल. निवडणुका जेव्हा होतील तेव्हा बघू, असं उत्तर राज यांनी दिलं.

    मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे. माझं तोंड आणि माझ्या सहकार्यांचं काम आहे. पक्ष म्हणून नेता ओळखला जातो. एक राजकीय पक्षाचा नेता म्हणून बघितलं जातं. भारतात निवडणुका प्रतिकांवर होत असतात. लोकांनी मोदींना पाहून मतदान केलं. तर बाळासाहेबांना पाहून राज्यात
    सत्ता दिली, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. देशात जो लाट निर्माण करतो तो जिंकतो. तसंच झालं. सध्या कोरोनाच्या लाटेवर सगळे स्वार आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.