मनसेचा मोठा निर्णय, लॉकडाऊन हवं का नको सुरु केले सर्वेक्षण

कोरोनाबाबत सावधानता बाळगी पाहिजे परंतु त्याची भिती घालू नका, तसेच लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊन हटवावे अशी मनसेची भूमिका आहे. त्यासाठी त्यांनी राज्यभरात सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ह्या सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून ऑनलाईन लिंक शेअर केली आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदविस वाढतच आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मार्च २०२० पासून राज्यात लॉकडाऊन केला आहे. यामुळे सर्व जनता घरातच बसली आहे. यामुळे बेरोजगारी, आणि आर्थिक समस्या उद्भवली आहे. यामुळे लॉकडाऊन हवं की नको याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने सर्वेक्षण सुरु केले आहे. 

कोरोनाबाबत सावधानता बाळगी पाहिजे परंतु त्याची भिती घालू नका, तसेच लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊन हटवावे अशी मनसेची भूमिका आहे. त्यासाठी त्यांनी राज्यभरात सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ह्या सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून ऑनलाईन लिंक शेअर केली आहे. यात काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. तसेच हे सर्वेक्षण १८ ऑगस्ट २०२० पर्यंत सुरु राहणार आहे. हे सर्वेक्षण पुर्ण झाल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर पुढील निर्णय घेतले जातील.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात खालीलपैकी प्रश्न विचारले आहेत. एकूण ९ प्रश्नांची यादी आहे. 

लॉकडाऊन पूर्णपणे संपुष्टात आणला पाहिजे का?, लॉकडाऊनचा तुमच्या नोकरी/उद्योगधंद्यावर नकारात्मक परीणाम झाला आहे का?, लॉकडाऊनच्या काळात आपल्या बुडालेल्या नोकरी व उद्योगधंद्यासाठी राज्य सरकार कडून योग्य मदत मिळाली आहे का?, राज्य सकरकारने तुमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे का?, शालेय शुल्काबाबतच्या सरकारी धोरणांची अंमल बजावणी होत आहे का?, लोकल रेल्वेसेवा आणि एस.टी. सेवा पूर्ववत सुरु झाली पाहिजे का?, लॉकडाऊनच्या काळातील वीज देयक बद्दल आपण समाधानी आहात का?, लॉकडाऊन काळात तुम्हाला वैद्यकीय मदत वेळेत व योग्य मिळाली आहे का?, या संपूर्ण काळात मुख्यमंत्री घरातच बसून केलेल्या कामकाजाबद्दल आपण समाधानी आहात का? असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांची उत्तरे होय, नाही, माहीत नाही अशाप्रकारे द्यायची आहेत. तसेच सोबत आपलं राहण्याचं ठिकाण आणि मोबाईल नंबर नमूद करायचा आहे.